पाक सैन्य कोणालाच जबाबदार नाही?
By admin | Published: October 16, 2016 12:57 AM2016-10-16T00:57:19+5:302016-10-16T00:57:19+5:30
पाकिस्तानी सैन्याला थेट जबाबदारीची कधीच परंपरा नव्हती, अशा शब्दात पाकिस्तानातील डॉन या वृत्तपत्राने सरकार आणि सैन्य यांना लक्ष्य केले आहे.
नवी दिल्ली : पाकिस्तानी सैन्याला थेट जबाबदारीची कधीच परंपरा नव्हती, अशा शब्दात पाकिस्तानातील डॉन या वृत्तपत्राने सरकार आणि सैन्य यांना लक्ष्य केले आहे.
या दैनिकाचे माजी संपादक अब्बास नासीर ‘पेल्यातील वादळ ’या शीर्षकाखाली लिहितात, फार कमी दैनिके सरकार व सैन्याविरुद्ध लिहिण्याची हिंमत करतात. सरकार व सैन्य यांच्यात सत्तेवरुन संघर्ष दिसत आहे. लष्करप्रमुख शरीफ नोव्हेंबरमध्ये निवृत्त होत आहेत. सर्जिकल स्ट्राइकनंतर राहिल शरीफ यांची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीवरून तर्कवितर्क केले जात आहेत. लष्करप्रमुखांच्या नियुक्तीचा अधिकार पंतप्रधानांना असला तरीही आतापर्यंत अनेकदा पाकिस्तानी सैन्याने सरकारला हटवून सत्ता हस्तगत केली आहे. (वृत्तसंस्था)