पाकने ड्रोनद्वारे भारतात टाकल्या रायफली; चिनी बनावटीच्या आठ ड्रोनचा केला वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 04:16 AM2019-09-26T04:16:30+5:302019-09-26T06:54:12+5:30

काश्मिरी अतिरेक्यांना खलिस्तानींची मदत

Pak launches drone rifles in India | पाकने ड्रोनद्वारे भारतात टाकल्या रायफली; चिनी बनावटीच्या आठ ड्रोनचा केला वापर

पाकने ड्रोनद्वारे भारतात टाकल्या रायफली; चिनी बनावटीच्या आठ ड्रोनचा केला वापर

googlenewsNext

चंदिगढ : पाकिस्तानातील खलिस्तानी दहशतवादी संघटनेने चिनी बनावटीच्या आठ ड्रोनद्वारे ९ ते १६ सप्टेंबर या काळात ८० किलो वजनाची शस्त्रास्त्रे, रायफली व दारूगोळा भारतात पोहोचवल्याचे उघड झाले आहे. जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांसाठी ही शस्त्रे पाठविण्यात आली होती, अशी माहिती पंजाब पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संघटनेचा पाठिंबा असलेला खलिस्तान झिंदाबाद फोर्स (केझेडएफ) ही संघटना लाहोर व जर्मनीत सक्रिय आहे. काश्मीरमध्ये घातपाती कारवाया करण्यासाठी ती प्रयत्नशील आहे. केझेडएफचा जर्मनीतील गुरमीतसिंह बग्गा, पाकमधील प्रमुख रणजीतसिंग यांच्या पुढाकाराने या कारवाया सुरू आहेत.
तरणतारण जिल्ह्यात २२ सप्टेंबर रोजी पोलिसांनी घातलेल्या धाडीत २२ शस्त्रास्त्रे जप्त केली. अमृतसर, तरणतारण येथे ड्रोनने ही शस्त्रे पोहोचविल्याची माहिती चौकशीतून उघड झाली. या तस्करीसाठी वापरलेले व अर्धवट जळालेले ड्रोनही पोलिसांनी जप्त केले आहे.
या प्रकरणी शुभदीप (२२ वर्षे) याला पंजाब पोलिसांनी मंगळवारी अटक केली. तो अमृतसर जिल्ह्यातील असून, तेथील कारागृहातील मानसिंग व आकाशदीप यांनी त्याला दहशतवादी मार्गाकडे वळविले. तरणतारण जिल्ह्यातील चोहला साहिब गावातून आणखी चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून पांढऱ्या रंगाची कारही जप्त करण्यात आली.

चिनी बनावटीच्या ड्रोनला १० किलो वजनाची शस्त्रे, दारूगोळ््याची पिशवी बांधून ते पाकिस्तानातून पंजाबमध्ये धाडण्यात आले. भारताच्या सीमेपासून दोन किमी अंतरावरील पाकिस्तानच्या गावातून हे ड्रोन पाठविण्यात आले. दोन हजार फूट उंचीवरून ५ किमीचे अंतर कापून ड्रोन भारतीय हद्दीत आले. तिथे ड्रोनला बांधलेली शस्त्रांची पिशवी उतरवण्यात आली आणि हस्तकांनी ती ताब्यात घेतली.

मोदी, डोवाल लक्ष्य?
हद्दीवर बीएसएफच्या जवानांचा पहारा असतो. तिथेही रडारावरून लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
काश्मीरमध्ये घातपाती कारवाया करण्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे अतिरेक्यांचे लक्ष्य असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Pak launches drone rifles in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.