पाक पोलिसांना ‘जय हिंद’ म्हणण्याचा तगादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 03:52 AM2017-12-30T03:52:30+5:302017-12-30T03:53:56+5:30

नवी दिल्ली : वारंवार फोन करून ‘जय हिंद’ म्हणण्यासाठी तगादा लावणा-या आणि तसे करण्यास नकार दिल्यावर अर्वाच्य भाषेत दमदाटी करणा-या एका निनावी भारतीयाविरुद्ध इस्लामाबाद पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

Pak police call for 'Jai Hind' | पाक पोलिसांना ‘जय हिंद’ म्हणण्याचा तगादा

पाक पोलिसांना ‘जय हिंद’ म्हणण्याचा तगादा

Next

नवी दिल्ली : वारंवार फोन करून ‘जय हिंद’ म्हणण्यासाठी तगादा लावणा-या आणि तसे करण्यास नकार दिल्यावर अर्वाच्य भाषेत दमदाटी करणा-या एका निनावी भारतीयाविरुद्ध इस्लामाबाद पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. ‘दी एक्स्प्रेस ट्रिब्युन’ या पाकिस्तानमधील वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार एका व्यक्तीने २५ डिसेंबर रोजी इस्लामाबाद पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला वारंवार फोन करून, तो घेणाºया अधिकाºयास ‘जय हिंद’च्या घोषणा देण्यासाठी तगादा लावला. पोलीस महानिरीक्षक व उपमहानिरीक्षकांना फोन जोडून देण्याचीही त्याने मागणी केली. यास नकार दिल्यावर फोन करणाºयाने शिवीगाळ करून धमकावले.
बोलणाºयाच्या भाषेवरून हा फोन कुठून आला असावा याचा अंदाज सुरुवातीस अधिकाºयांना आला नाही. पण त्याने ‘जय हिंद’साठी तगादा लावला यावरून हा फोन करणारा भारतातील असावा, असा त्यांनी कयास केला.

Web Title: Pak police call for 'Jai Hind'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.