पाक टेरर बोट - तटरक्षक दलचा अधिकारी व केंद्र सरकार आमने सामने

By admin | Published: February 18, 2015 09:54 AM2015-02-18T09:54:38+5:302015-02-18T13:02:28+5:30

नववर्षाच्या पूर्वसंध्येला गुजरातमधील पोरबंदर येथे पाकमधून आढळलेल्या बोटीचा गुंता आणखी वाढला आहे. बोटीला तटरक्षक दलाच्या जवानांनी उडवले होते असा दावा तटरक्षक दलाच्या वरिष्ठ अधिका-याने केला आहे.

Pak Terror boat - Coast Guard officer and central government face-to-face | पाक टेरर बोट - तटरक्षक दलचा अधिकारी व केंद्र सरकार आमने सामने

पाक टेरर बोट - तटरक्षक दलचा अधिकारी व केंद्र सरकार आमने सामने

Next

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १८ - नववर्षाच्या पूर्वसंध्येला गुजरातमधील पोरबंदर येथे पाकिस्तानमधून आलेल्या बोटीचा गुंता आणखी वाढला आहे. बोटीला तटरक्षक दलाच्या जवानांनी उडवले होते असा दावा तटरक्षक दलाच्या वरिष्ठ अधिका-याने केला आहे. विशेष म्हणजे, इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिल्यानंतर डीआयजी लोशाली यांनी या वृत्ताचा इन्कार केला आणि आपले म्हणणे चुकीच्या पद्धतीने सांगण्यात आल्याचा दावा केला. त्यावर कडी करताना इंडियन एक्स्प्रेसने लोशाली यांच्या भाषणाची चित्रफीत अपलोड केली आहे. यामध्ये सदर बोट उडवण्याचे आदेश आपणच गांधीनगर येथून तटरक्षक दलाच्या जवानांना दिल्याचे ते सांगताना दिसत आहेत. या सगळ्या प्रकारामुळे तटरक्षक दल आणि संरशक्षण खाते आमनेसामने असल्याचे चित्र आहे.
केंद्र सरकार व तटरक्षक दलाच्या अधिका-याने परस्परविरोधी विधान केल्याने बोटीभोवती संशयाचे धुके निर्माण झाले आहे. 
गेल्या वर्षी ३१ डिसेंबर रोजी देशभरात नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरु असतानाच गुजरातमधील पोरबंदरजवळील समुद्रात पाकिस्तानमधून आलेली संशयास्पद बोट आढळली होती. तटरक्षक दलाच्या जवानांनी बोटीचा पाठलाग केला असता बोटीवरील चार ते पाच संशयित दहशतवाद्यांनी बाँबस्फोट घडवून बोटीला उडवल्याचा दावा केंद्र सरकारने केला. तर भारतात पुन्हा २६/११ सारखा हल्ला घडवण्याचा प्रयत्न उधळला असा दावा तटरक्षक दलानेही केला होता. मात्र या कारवाईविषयी सुरुवातीपासूनच शंका उपस्थित होत होत्या. संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनीदेखील स्मगलर आत्महत्या करत नाहीत असे सांगत बोटीत दहशतवादी होते असा दावा करत बोटीवरील संशयितांनीच बोट उडवली असे स्पष्ट केले होते. 
मात्र आता तटरक्षक दलाच्याच वरिष्ठ अधिका-याने या दाव्याशी विसंगत विधान केल्याचे समोर येत आहे. 'तुम्हाला ३१ डिसेंबरची रात्र आठवत असेल, त्या दिवशी पाकमधून एक बोट आली होती, त्या बोटीला उडवण्याचे आदेश मीच दिले होते, आम्हाला त्या लोकांना बिर्यानी द्यायची नव्हती' असे विधान तटरक्षक दलाचे डीआयजी बी. के. लोशाली यांनी केले. लोशाली  गुजरातमधील तटरक्षक दलाच्या एका कार्यक्रमात बोलत होते. लोशाली यांचा हा दावा आता मोदी सरकारची डोेकेदुखी वाढवेल असे दिसते.

Web Title: Pak Terror boat - Coast Guard officer and central government face-to-face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.