दोन सैनिकांच्या मृतदेहांसाठी पाकचे पांढरे निशाण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 07:03 AM2019-09-15T07:03:47+5:302019-09-15T07:03:54+5:30
जम्मू-काश्मीरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करून सीमेवर अंदाधुंद गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांना भारतीय जवानांची चोख प्रत्त्युतर दिले आहे.
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करून सीमेवर अंदाधुंद गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांना भारतीय जवानांची चोख प्रत्त्युतर दिले आहे. भारतीय जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात पाकिस्तानचे सैनिक ठार झाल्यानंतर, ते आमचे नसल्याचा दावा करणाºया पाकिस्तानी लष्कराला नंतर मात्र पांढरे निशाण दाखवून आपल्या दोन सैनिकांचे मृतदेह नेण्याची वेळ आली.
या गोळीबारानंतर पाकिस्तानने मृतदेह नेण्यासाठी पुढे येण्याचा प्रयत्न केला होता, पण भारतीय जवानांच्या आक्रमक पवित्र्यामुळे त्यांना ते शक्य झाले नाही. अखेर पांढरे निशाण फडकावून ते नेण्याची नामुष्की पाकिस्तानवर आली. हा प्रकार हाजीपूर सेक्टरमध्ये १0 व ११ सप्टेंबर रोजी दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला होता. पांढरे निशाण दाखवत असल्याचा व्हिडीओ १३ सप्टेंबरचा असून, तो शनिवारी समोर आला.
पाकिस्तानच्या सैनिकांनी पांढरे निशाण हातात घेतले आहे आणि ते आपल्या सहकाऱ्यांचे मृतदेत नेत आहेत, असे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या पुराव्यामुळे आमचे सैनिक मरण न पावल्याचा पाकिस्तानचा आधीचा दावा खोटा असल्याचे उघड झाले आहे. पांढरे निशाण हे सरणागती वा युद्धविरामाच्या वेळी दाखविले जाते.
पाकिस्तानचे जे दोन सैनिक गोळीबारात ठार
झाले, त्यात पंजाब प्रांतातील बहावलनगर भागात राहणाºया गुलाम सरूल याचा समावेश आहे. पाकिस्तानच्या ठार झालेल्या सैनिकांमध्ये गुलाम सरूलचा समावेश आहे.
दुसरा सैनिकही पंजाब प्रांतातील आहे. त्याचा मृतदेह
ताब्यात घेण्यासाठी पाकिस्तानी लष्कराला बरेच प्रयत्न
करावे लागले.
या आधीही केरन सेक्टरमध्ये पाकिस्तानचे ५ ते ७ सैनिक व दहशतवादी ठार झाले होते. त्यांचे मृतदेह नेण्याचा पाकिस्तानी लष्कराने प्रयत्नच केला नव्हता. ते सैनिक आमच्या पंजाबमधील नसून काश्मीरचे वा नॉर्दन लाइट इन्फॅन्ट्रीचे आहेत, असे त्यांचे म्हणणे होते. पाकिस्तानी सैनिकांमध्ये पंजाबी मुस्लिमांचे प्राबल्य असून, अन्य प्रांतांतील आपल्याच सैनिकांना ते फार महत्त्व देत नाहीत. (वृत्तसंस्था)