क्लस्टर बॉम्ब वर्षावाचे पाकिस्तानचे आरोप खोटे; जवानांकडून सडेतोड उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2019 08:44 PM2019-08-03T20:44:13+5:302019-08-03T20:45:27+5:30
पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना घुसविण्यासाठी सीमेवर जोरदार फायरिंग सुरू आहे.
नवी दिल्ली : भारत पाकिस्तानच्या सीमेमध्ये क्लस्टर बॉम्ब वर्षाव करत असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. मात्र, पाकिस्तानकडून सीमारेषेवर गोळीबार केला जात असून त्याच्या मदतीने दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत घुसविण्याचे प्रकार सुरू असल्याचे प्रत्यूत्तर भारतीय सैन्याने दिले आहे.
पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना घुसविण्यासाठी सीमेवर जोरदार फायरिंग सुरू आहे. आम्ही फक्त त्यांच्या गोळीबाराला प्रत्यूत्तर देतो. आमचे जवान पाकिस्तानी सैन्य आणि घुसखोरी करत असलेल्या दहशतवाद्यांना लक्ष्य करत आहेत. भारत क्लस्टर बॉम्ब वापरत असल्याचा आरोप हा पाकिस्तानचा खोटेपणा असल्याचे लष्कारने आज सांगितले.
भारतीय सेनेने सांगितले की, पाकिस्तान नेहमी गोळीबार करत त्याच्या आड घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतेय. त्यांच्याशी उच्चस्तरीय चर्चेवेळी अनेकदा ही बाब सांगितली आहे. तसेच पाकिस्तानच्या गोळीबाराला उत्तर देण्याचे अधिकार भारताकडे सुरक्षित असल्याचेही त्यांना सांगितले आहे.
क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय?
क्लस्टर बॉम्ब खूप विध्वंसक असतात. हा काही बॉम्बचा गुच्छ असतो. हे बॉम्ब लढाऊ विमानांतून खाली टाकले जातात. एका क्लस्टर बॉम्बमध्ये काही बॉम्बचे गुच्छ असतात. हे बॉम्ब टाकल्यानंतर हवेतच वेगळे होऊन काही मैल उडू शकतात. हे बॉम्ब जेथे पडतात तेथे 25 ते 30 मीटरच्या भागात जबरदस्त नुकसान करतात.