पाकिस्तानचा पुन्हा गोळीबार
By admin | Published: October 12, 2014 02:23 AM2014-10-12T02:23:46+5:302014-10-12T02:23:46+5:30
काही तासांच्या शांततेनंतर पाकिस्तानने शनिवारी पुन्हा एकदा डोके वर काढत शस्त्रसंधीचे उल्लंघन केल़े
Next
>शस्त्रसंधीचे उल्लंघन : शांतता ठरली औटघटकेची, भारताचे चोख प्रत्युत्तर
जम्मू : काही तासांच्या शांततेनंतर पाकिस्तानने शनिवारी पुन्हा एकदा डोके वर काढत शस्त्रसंधीचे उल्लंघन केल़े जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळील अग्रिम चौक्यांना पाकिस्तान रेंजर्सनी लक्ष्य केल़े भारतीय जवानांनीही याचे चोख प्रत्युत्तर दिल़े या गोळीबारात कुठल्याही हानीचे वृत्त नाही़
लष्कराच्या वरिष्ठ अधिका:याने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैनिकांनी दुपारी 1 च्या सुमारास बनवात सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर गोळीबार केला़ भारतीय जवानांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिल़े गेल्या नऊ दिवसांपासून पाककडून होत असलेला मारा गुरुवारी रात्री मंदावला होता. जम्मू व सांबा जिल्ह्यात गुरुवारी गोळीबाराची घटना घडली नव्हती; मात्र आंतरराष्ट्रीय सीमेवर कठुआ जिल्ह्यातील चार भारतीय चौक्यांना पाकिस्तानने लक्ष्य केले होत़े तोफमा:यात आठ लोक ठार, तर सुरक्षा दलाच्या जवानांसह 9क् पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत.
च्जम्मू : भारत-पाक सीमेवरील तणावामुळे कठुआ जिल्ह्यातील 57 सीमावर्ती गावांतील 1998 कुटुंबांनी म्हणजे सुमारे 1क् हजार लोकांनी स्थलांतर केले आह़े
च्9597 लोक हिरानगर आणि मरहीन तहसीलमधील 35 शिबिरांमध्ये आहेत़ सीमेवरील या 57 गावांपैकी 41 गावे पाकिस्तानच्या गोळीबारांनी थेट प्रभावित झालीत़ पाक रेंजर्स सीमा भागातील गावांना लक्ष्य करीत आहेत़
पाक म्हणतो, ‘भारताने छोटे युद्धच खेळले’ : भारतीय सैन्याकडून सियालकोट सीमेवर झालेला गोळीबार हा दोन देशांतील ‘छोटय़ा स्वरूपाचे युद्ध’च होते. भारत केवळ युद्धबंदीचेच उल्लंघन करीत नसून पाकिस्तानशी छोटे युद्धच करीत आहे, असे रेंजर्सचे महासंचालक मेजर जनरल ताहीर जावेद खान यांनी म्हटले. ते येथे पत्रकारांशी बोलत होते.