पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन; दोन नागरिकांचा मृत्यू, सहाजण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 07:15 PM2019-12-03T19:15:56+5:302019-12-03T19:16:01+5:30
जम्मू- काश्मीरच्या पूँछ जिल्ह्यातील शहापूर आणि किर्णी सेक्टरच्या नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळाबार केला.
नवी दिल्ली: जम्मू- काश्मीरच्या पूँछ जिल्ह्यातील शहापूर आणि किर्णी सेक्टरच्या नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळाबार केला. भारतीय सैन्याने देखील जोरदार प्रत्युत्तर दिले. मात्र पाकिस्तानच्या या नापाक कृत्यामुळे नियंत्रण रेषेवर असणाऱ्या गावातील दोन नागरिकांचा मृत्यू झाला. तर सहाजण गंभीर जखमी असून त्यांनी जवळच्या स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.
संरक्षण प्रवक्त्यांनी सांगितले की, पाकिस्तानने मंगळवारी दुपारच्या 2.30 वाजताच्या सुमारास पूँछ मधील शहापूर व किर्णी या दोन सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लघन करुन गोळीबार करण्यास सुरुवात केली. तसेच 182 एमएम उकळी तोफ्यांचा मारा केल्यामुळे सीमारेषेवरील घरांचे नुकासान झालं असल्याचं त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे भारतीय सैन्याकडूनही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
#UPDATE Jammu and Kashmir: Two civilians died and seven were injured in ceasefire violation by Pakistan in Shahpur sector of Poonch district, today. https://t.co/XWZhic6KY3pic.twitter.com/NxOV2hwq2U
— ANI (@ANI) December 3, 2019