पाकिस्तानी विमानांच्या भारतीय सीमेवर घिरट्या
By Admin | Published: May 25, 2017 02:36 AM2017-05-25T02:36:54+5:302017-05-25T06:34:43+5:30
दहशतवाद्यांच्या काश्मिरातील घुसखोरीला मदत करणाऱ्या पाकिस्तानच्या चौक्यांवर भारतीय लष्कराने हल्ले केल्यानंतर पाकिस्तानात खळबळ माजली असून
इस्लामाबाद : दहशतवाद्यांच्या काश्मिरातील घुसखोरीला मदत करणाऱ्या पाकिस्तानच्या चौक्यांवर भारतीय लष्कराने हल्ले केल्यानंतर पाकिस्तानात खळबळ माजली असून, आम्हीही १३ मे रोजी भारतीय चौक्यांवर हल्ले केले होते, असा दावा करणारा व्हिडीओ पाकिस्तानने मंगळवारी रात्री जारी केला. तो अर्थातच, बोगस असल्याचे लगेच सिद्ध झाले. त्यानंतर, पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी भारतीय सीमेपाशी घिरट्या घातल्या. एवढेच नव्हे, तर कोणत्याही राष्ट्राने आमच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केल्यास, त्यांच्या चार पिढ्य़ांना अद्दल घडेल, अशी कारवाई आम्ही करू, असा इशारा पाकिस्तानच्या हवाई दलप्रमुखांनी केला.
पाकच्या लढाऊ विमानांनी भारतीय सीमेपाशी घिरट्या घातल्या असल्या, तरी तो भाग त्या देशाचा आहे आणि भारतीय हद्दीचे त्यामुळे उल्लंघन झालेले नाही, असा दावा भारतीय हवाई दलाने केला. भारतीय चौक्यावर हल्ले केले होते, असा दावा करीत पाकने एक व्हिडीओ जारी केला. मात्र, तो बोगस असल्याचे उघड झाले.
संबंध बिघडण्याची शक्यता
भारतीय लष्कराने पाक चौक्यांवर केलेल्या हल्ल्यानंतर दोन देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पाकला आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळे पाडून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचा विचार भारत करत आहे, अशी माहिती संरक्षण गुप्तचर विभागाचे संचालक ले. जनरल विन्सेंट स्टिवॉर्ट यांनी दिली.
भारतीय लष्कराने पाक चौक्यांवर केलेल्या हल्ल्यानंतर दोन देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पाकला आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळे पाडून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचा विचार भारत करत आहे, अशी माहिती संरक्षण गुप्तचर विभागाचे संचालक ले. जनरल विन्सेंट स्टिवॉर्ट यांनी दिली.
पाकिस्तानचे अण्वस्त्र
भंडार सातत्याने वाढत असल्यामुळे अमेरिकेला काळजी आहे, असे नमूद करतानाच पाकच्या कारवायांमुळे दोन देशांतील संबंध या वर्षात अधिक बिघडण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
पाकिस्तानच्या मदतीत कपात
वॉशिंग्टन : आर्थिक वर्ष २०१८साठी पाकिस्तानला देण्यात येणाऱ्या विदेशी सैन्य निधीत कपात करून, ही मदत २५.५ कोटी अमेरिकी डॉलरवरून १० कोटी अमेरिकी डॉलर करण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेतला आहे. शिवाय अनुदानाऐवजी कर्ज म्हणून ही रक्कम द्यावी, असा विचार अमेरिका करीत आहे.
धडा शिकविण्याची केली भाषा
पाकच्या लढाऊ विमानांनी सियाचीन ग्लेशियरजवळ आज सकाळी उड्डाण केल्याचे वृत्त तेथील टीव्हीने दिले. या वृत्तात पाक हवाई दलाचे सर्व तळ सक्रिय करण्यात आल्याचे म्हटले आहे.पाकिस्तान हवाई दलाचे एअर चिफ मार्शल सोहेल अमान यांनी स्कार्डूतील सीमावर्ती तळाला बुधवारी भेट दिली. या वेळी मिराज विमान चालवत त्यांनी ते भारतीय हद्दीतून नेले, असा दावा या वृत्तात होता. भारताने तो फेटाळून लावला. सोहेल अमान यांनी आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना आम्ही असा धडा शिकवू की, त्यांच्या अनेक पिढ्या ते लक्षात ठेवतील, असा इशारा त्यांनी दिला.