होय, जिहादच्या नावाखाली पाक सेना, ISI ट्रेनिंग देते; अटक केलेल्या दहशतवाद्याचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 07:37 AM2021-09-29T07:37:15+5:302021-09-29T07:43:25+5:30

भारतात उरीसारखा हल्ला पुन्हा करण्याचा दहशतवाद्यांचा कट सैन्याच्या सतर्कतेमुळे उधळण्यात आला आहे.

pakistan army and isi give training to spread terror in the name of jihad in jammu kashmir | होय, जिहादच्या नावाखाली पाक सेना, ISI ट्रेनिंग देते; अटक केलेल्या दहशतवाद्याचा खुलासा

होय, जिहादच्या नावाखाली पाक सेना, ISI ट्रेनिंग देते; अटक केलेल्या दहशतवाद्याचा खुलासा

Next
ठळक मुद्देजिहादच्या नावाखाली पाक सेना, ISI ट्रेनिंग देतेतीन आठवडे ९ जणांना प्रशिक्षणअटक केलेल्या दहशतवाद्याचा खुलासा

श्रीनगर: भारतात उरीसारखा हल्ला पुन्हा करण्याचा दहशतवाद्यांचा कट सैन्याच्या सतर्कतेमुळे उधळण्यात आला आहे. लष्कराने ९ दिवस राबवलेल्या ऑपरेशनमध्ये एक दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला तर एका दहशतवाद्याला ताब्यात घेण्यात आले आहे. भारतीय सैन्याने अटक केलेल्या दहशतवाद्याने सुरक्षा यंत्रणांसमोर मोठे खुलासे केले आहेत. जिहादच्या नावाखाली पाक सेना आणि आयएसआयकडून प्रशिक्षण दिले जाते, असे या दहशतवाद्याने स्पष्ट केले आहे. (pakistan army and isi give training to spread terror in the name of jihad in jammu kashmir)

जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला येथील उडी सेक्टरमध्ये भारतीय सैन्याने कारवाई करत दहशतवाद्यांचे मनसुबे उधळून लावले. या दहशतवाद्याकडून मोठा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. १८ सप्टेंबरला सहा दहशतवादी भारतीय सीमेमध्ये घुसल्याची माहिती मिळाली होती. तेव्हापासून लष्कराने शोधमोहीम राबवण्यास सुरुवात केली होती. या कारवाईत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले असून, एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. अली बाबर पात्रा असे त्याचे नाव आहे. 

जिहादच्या नावाखाली प्रशिक्षण

पाकिस्तानी सेना, पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय आणि दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा जिहादच्या नावाखाली काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया घडवून आणते. तरुणांना प्रशिक्षण देण्याचे काम केले जाते. दहशतवादी संघटना गरीब आणि असहाय्य मुलांचा फायदा घेतात, असे बाबर याने सांगितले. बाबर दीपालपूर येथील रहिवासी असून, विधवा आई आणि एक दत्तक घेतलेली बहीण असा त्याचा परिवार आहे. बाबरचे कुटूंब अतिशय गरीब असून, दोन वेळेच्या जेवणाची, चांगल्या अन्नाचीही भ्रांत असल्याचे सांगितले जात आहे. बाबरनेच यासंदर्भातील माहिती दिली. बाबरने सांगितले की, सातवी इयत्तेत असताना शाळा सोडली. यानंतर सिलायकोट येथील एका कंपनीत काम करताना त्याची भेट एका आयएसआय आणि लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या तरुणासोबत झाली. गरीब आणि गरजू मुलांना हेरण्याचे काम लष्कर-ए-तोयबा करते, असेही बाबरने सांगितले. 

तीन आठवडे ९ जणांना प्रशिक्षण

पाकिस्तानी सेनेने गडी हबीबुल्ला येथील एका कॅम्पमध्ये फेब्रुवारी २०१९ दरम्यान तीन आठवडे प्रशिक्षण दिले. यावेळी ९ पाकिस्तानी मुलेही तेथे होती. सर्वांना जिहादच्या नावाखाली प्रशिक्षण दिले गेले. दहशतवादी कारवायांसाठी तयार करण्यात आले. पाकिस्तानी सेनेतील सुबेदार पदाच्या व्यक्तींकडून सदर प्रशिक्षण देण्यात आले, असे बाबरने सांगितले.
 

Web Title: pakistan army and isi give training to spread terror in the name of jihad in jammu kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.