पाक लष्कर आणि आयएसआयचा ‘विष’कट; जम्मू-काश्मीरमध्ये अलर्ट जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2019 09:19 AM2019-03-02T09:19:52+5:302019-03-02T09:25:11+5:30

सीमेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरुच आहे. यातच आता दहशतवादी संघटनांना मदत करण्यासाठी 'द इंटर -सर्व्हिसेस इंटेलिजेन्स' (आयएसआय) या पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनचे  मोठे षड्यंत्र समोर आले आहे.  

pakistan army and isi poisoned conspiracy against indian security forces in jammu kashmir | पाक लष्कर आणि आयएसआयचा ‘विष’कट; जम्मू-काश्मीरमध्ये अलर्ट जारी

पाक लष्कर आणि आयएसआयचा ‘विष’कट; जम्मू-काश्मीरमध्ये अलर्ट जारी

Next
ठळक मुद्देपुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत- पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण आहे.पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय पुन्हा एका जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलाचे नुकसान करण्याची षड्यंत्र आखत आहेत. काश्मीरमधील सर्व भारतीय सुरक्षा दलांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत- पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण आहे. सीमेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरुच आहे. यातच आता दहशतवादी संघटनांना मदत करण्यासाठी 'द इंटर -सर्व्हिसेस इंटेलिजेन्स' (आयएसआय) या पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनचे मोठे षड्यंत्र समोर आले आहे.  

दरम्यान, पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय पुन्हा एका जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलाचे नुकसान करण्याची षड्यंत्र आखत आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, भारतीय सुरक्षा दलाच्या रेशन स्टॉकमध्ये विष कालवून मोठ्या प्रमाणावर नरसंहार करण्याचा प्लान पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयकडून करण्यात आल्याचे समजते.

भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांवर विष प्रयोग करण्यासाठी आयएसआय आपल्या काश्मीरमधील एजेंटचा वापर करु शकेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर काश्मीरमधील सर्व भारतीय सुरक्षा दलांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय भारतीय गुप्तहेर संस्थेला मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीसह देशातील अनेक शहरातील महत्त्वाची ठिकाणे दहशवाद्यांच्या निशाणावर आहेत. त्यामुळे दिल्लीत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.  

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये 14 फेब्रुवारीला 'जैश-ए-मोहम्मद'च्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. त्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. या कारवाईत बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळांवर भारताच्या ‘मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी 1000 किलोचे बॉम्ब फेकले. यात जवळपास 300 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे सांगण्यात येते.

Web Title: pakistan army and isi poisoned conspiracy against indian security forces in jammu kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.