ना'पाक'कडून आता LoCवर हल्ला, नौशेरातील एक जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2018 08:36 AM2018-05-24T08:36:24+5:302018-05-24T09:16:33+5:30

सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढताहेत. यामुळे सीमारेषेवर तणाव निर्माण झाला आहे.

Pakistan army violates ceasefire on line of control | ना'पाक'कडून आता LoCवर हल्ला, नौशेरातील एक जण जखमी

ना'पाक'कडून आता LoCवर हल्ला, नौशेरातील एक जण जखमी

Next

श्रीनगर - सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढताहेत. यामुळे सीमारेषेवर तणाव निर्माण झाला आहे. गेल्या 10 दिवसांपासून सीमारेषेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर गोळीबार करणाऱ्या पाकिस्ताननं बुधवारी (23 मे) आता LoCला लक्ष्य केले आहे. बुधवारी रात्री उशिरा पाकिस्ताननं उरी सेक्टरमधील कमलकोट परिसरात तोफगोळ्यांचा मारा केला. बारामुल्ला जिल्ह्यामध्येही LoCवर गोळीबार क करण्यात आला. स्वयंचलित शस्त्रास्त्र आणि तोफगोळ्यांच्या सहाय्यानं पाकिस्ताननं हल्ला केला. 

कुरापती पाकिस्तानानं नौशेरा सेक्टरमध्येही गोळीबार केला. या हल्ल्यात एक नागरिक जखमी झाला. दरम्यान, पाकिस्तानी रेंजर्सकडून जम्मू, कथुआ आणि सांबा जिल्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय सीमारेषेजवळील गावांना आणि लष्करी चौक्यांना लक्ष्य करण्यात आले होते. या हल्ल्यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानकडून वारंवार होणाऱ्या गोळीबारामुळे परिसरातील सरकारी तसंच खासगी शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.  

तर जम्मू, सांबा आणि कथुआ जिल्ह्यातील गावांना व लष्करी तळांवर गेल्या 10 दिवसांपासून पाकिस्तानकडून हल्ला होत असल्यानं 40,000 हून अधिक जणांना स्थलांतर करावं लागले आहे. तेथील किमान 100 गावे ताबडतोब रिकामी करण्यात आली आहेत. त्या भागांतील सर्व शाळा बंद करण्यात आल्या असून, रहिवाशांना अन्यत्र हलविण्याचे काम सुरू केले आहे.

मंगळवारी सकाळीही एक आठ महिन्यांचे मूल मरण पावले होते. सोमवारी एक महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे पाक दुतावासातील अधिका-याला परराष्ट्र खात्याने बोलावून गंभीर समज दिली. ‘गेल्या 9 दिवसांत पाकच्या गोळीबारात मरण पावलेल्यांची संख्या 10 झाली आहे. 2 जवानही शहीद झाले.  

बीएसएफच्या ४0 चौक्यांवर गोळीबार, तोफांचा मारा
पाकिस्तानने बीएसएफच्या जवळपास ४0 चौक्यांना लक्ष्य केले असून, गोळीबाराबरोबरच सीमेपलिकडून तोफांचा माराही सुरू आहे.
गोळीबार व तोफमारा यांमुळे सीमेवरील गावांतील अनेक घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे, तर काही घरी आता राहण्यायोग्य राहिलेलीच नाहीत. या प्रकारामुळे नियंत्रण रेषेवरील गावांमध्ये प्रचंड घबराट उडाली आहे. सुमारे १00 गावांतील लोकांना पोलीस व सशस्त्र दलांच्या मदतीने सुरक्षित छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे.

आक्रमकपणे प्रत्युत्तर द्या
पाकिस्तानच्या हल्ल्यांना त्याहून अधिक आक्रमकपणे उत्तर द्या, अशा सूचना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारीच बीएसफएफच्या जवानांना दिल्या होत्या. त्यानंतर पाकिस्तानी रेंजर्सनी हल्ल्याची तीव्रता वाढवली आहे. तीन दिवसांपूर्वी बीएसएफने पाकच्या अनेक चौक्या पार उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानी रेंजर्सनी आता हल्ले थांबवा, अशी गयावया बीएसएफला केली होती. पण स्वत: मात्र गोळीबार थांबवला नाही.
 




 

Web Title: Pakistan army violates ceasefire on line of control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.