काश्मीरमधील हिंसाचारामागे पाकिस्तानच!
By admin | Published: August 11, 2016 01:47 AM2016-08-11T01:47:20+5:302016-08-11T01:47:20+5:30
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे २५ जुलै रोजी पकडण्यात आलेला पाकिस्तानी दहशतवादी बहादूर अली याच्या कबुली जबाबावरून जम्मू-काश्मीरमधील हिंसाचार आणि अशांततेमागे पाकिस्तानी
नबीन सिन्हा, नवी दिल्ली
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे २५ जुलै रोजी पकडण्यात आलेला पाकिस्तानी दहशतवादी बहादूर अली याच्या कबुली जबाबावरून जम्मू-काश्मीरमधील हिंसाचार आणि अशांततेमागे पाकिस्तानी लष्कर आणि लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनाच असल्याचे उघड झाले आहे.
राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) बहादूर अलीने दिलेल्या कबुलीचा व्हिडिओ बुधवारी जारी करून पाकिस्तानी लष्कर आणि लष्कर-ए-तैयबाच्या भारतविरोधी कारस्थानाचा पर्दाफाश केला. लष्कर-ए-तैयबाच्या निर्देशानुसार काश्मीर खोऱ्यातील बेरोजगार तरुणांना हाताशी धरून भारतीय सुरक्षा दलावर दगडफेकीसह अन्य हिंसक कारवाया घडवून अशांतता निर्माण केली. यासाठी दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधूनच पैसाही गोळा करण्यात आला. हे कटकारस्थान अत्यंत पद्धतशीरपणे रचण्यात आले, असे एनआयचे महानिरीक्षक संजीव सिंह यांनी बहादूर अलीची कबुली आणि प्राप्त ठोस पुराव्याच्या आधारे सांगितले.
अली याला पकडले त्यावेळी तो पाकिस्तानमधील आपल्या म्होरक्यांशी बोलत होता. दहशतवादी संघटना पाकव्याप्त काश्मीरमधून पाकिस्तानी लष्कराच्या मदतीने सर्वतोपरी मार्गदशन करायच्या. वनी ठार झाल्यानंतर काश्मीरमध्ये हिंसाचार घडवून अशांतता फैलावण्याचे कटकारस्थान लष्कर-ए-तैैयबा, हिज्बुल मुजाहिदीनसह अन्य दहशतवादी संघटना आणि हाफीज सईद, सय्यद सलाहऊद्दीन यांनी रचले.