पाकिस्ताननं भारतासाठी हवाई हद्द केली बंद, काश्मीरचा मुद्दा इम्रान यांच्या जिव्हारी  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 11:33 AM2019-08-28T11:33:50+5:302019-08-28T11:35:58+5:30

पाकिस्ताननं भारतासाठी स्वतःची हवाई हद्द बंद केली आहे.

Pakistan closes Karachi airspace partially shut till August 31 for india | पाकिस्ताननं भारतासाठी हवाई हद्द केली बंद, काश्मीरचा मुद्दा इम्रान यांच्या जिव्हारी  

पाकिस्ताननं भारतासाठी हवाई हद्द केली बंद, काश्मीरचा मुद्दा इम्रान यांच्या जिव्हारी  

googlenewsNext

नवी दिल्लीः काश्मीरच्या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर तोंडघशी पडलेला पाकिस्तान आता भारताला धमक्या देत सुटला आहे. पाकिस्ताननं भारतासाठी स्वतःची हवाई हद्द बंद केली आहे. पाकिस्ताननं ही हवाई हद्द 31 ऑगस्टपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात भारतासाठी बंद केली आहे. परंतु पाकिस्तान ही हवाई हद्द भारतासाठी कायमस्वरूपी बंद करण्याच्या विचारात आहे.  

तत्पूर्वी काश्मीरसाठी आम्ही कोणत्याही मर्यादेपर्यंत जाण्यास तयार आहोत. दोन्ही देशांकडे आण्विक शक्ती आहे आणि त्याचा वापर केल्यास जगात हाहाकार माजेल, इम्रान खान यांनी अप्रत्यक्षरीत्या भारताला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली होती. त्यानंतर आता पाकिस्तानने भारतीय वायू सेनेला दिलेली परवानगी नाकारली आहे. पाकिस्तानमधून अफगाणिस्तान येथे जाण्यास पाकिस्तान सरकारनं भारतीय एअर कंपन्यांना मज्जाव केला आहे.

पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. तसेच सुरुवात मोदींनी केली होती, आता शेवट आम्ही करणार, असेही चौधरी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले होते. भारतासाठी पाकिस्तानचे तात्पुरत्या स्वरूपात एअरस्पेस बंद केला आहे. तसेच भारत आणि अफगानिस्तान यांच्यातील व्यापारी संबंधांनाही आळा घालण्याचा डाव पाकिस्तान सरकारचा आहे.  इम्रान यांच्या कॅबिनेट बैठकीत यावर चर्चा झाली आहे.

 जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर श्रीनगरच्या सचिवालयावर भारताचा तिरंगा डौलानं फडकला आहे. कलम 370 हटविल्यानंतर लडाख हा स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश जाहीर करण्यात आला आहे. तसेच अन्य राज्यांप्रमाणे जम्मू-काश्मीर येथेही दर 5 वर्षांनी विधानसभा निवडणुका घेतल्या जाणार आहेत. भारत सरकारने घेतलेला हा निर्णय पाकिस्तानच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. पाकिस्तानचा तिळपापड झाला असून पंतप्रधान इम्रान खानसह त्यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री बेताल वक्तव्य करत आहेत. 

Web Title: Pakistan closes Karachi airspace partially shut till August 31 for india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.