"पाकिस्तानची जनता फाळणीला मानते चूक, तिकडे दु:ख आणि भारतात सुख"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2023 12:24 PM2023-04-02T12:24:44+5:302023-04-02T12:26:34+5:30
सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य
भाेपाळ: स्वातंत्र्याच्या सात दशकांनंतरही पाकिस्तानातील जनता खूश नाही. भारताची फाळणी एक चूक हाेती, असे तेथील जनतेला आता वाटत असल्याचा वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक माेहन भागवत यांनी केले.
भाेपाळमध्ये क्रांतीकारी हेमू कालाणी यांच्या जयंतीनिमित्त आयाेजित कार्यक्रमात ते बाेलत हाेते. भागवत यांनी सांगितले, की अखंड भारत सत्य आहे आणि खंडित भारत एक दु:स्वप्न आहे. भारतापासून वेगळे झाल्यानंतर सात दशक लाेटले, तरीही आज पाकिस्तानात दु:ख आहे आणि भारतात सुख आहे. भारत खंडित झाला. पाकिस्तानातील लाेक म्हणतात ती चूक हाेती. जे सत्य आहे तेच टिकते. जे चुकीचे आहे, ते येत-जात राहते. आपल्याला नवा भारत उभारायचा आहे, असेही भागवत म्हणाले.
सिंधी समाजाबाबत भागवत म्हणाले, की शहीद हेमू यांचे नाव सिंध प्रांताशी जुळले आहे. स्वातंत्र्यलढ्यात सिंधी समाजाच्या याेगदानाचा उल्लेख कमी हाेताे. हा समाज सर्वकाही गमावून देखील शरणार्थी बनला नाही, तर त्यांनी पुरुषार्थी बनून जगाला दाखवून दिले, असे भागवत म्हणाले.