भारताने उधळला पाकिस्तानचा मोठा कट! सुरक्षादलाने डिकोड केला महिलांशी संबंधित 'पॅटर्न'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 12:19 PM2023-08-11T12:19:26+5:302023-08-11T12:37:31+5:30

भारतीय सुरक्षारक्षकांनी दहशतवाद्यांशी संबधित मोठी अपडेट मिळवली आहे.

pakistan conspiracy busted weapons are being sent to terrorists through active women ogws in kashmir | भारताने उधळला पाकिस्तानचा मोठा कट! सुरक्षादलाने डिकोड केला महिलांशी संबंधित 'पॅटर्न'

भारताने उधळला पाकिस्तानचा मोठा कट! सुरक्षादलाने डिकोड केला महिलांशी संबंधित 'पॅटर्न'

googlenewsNext

पाकिस्तानच्या एका मोठ्या कटाचा नुकताच पर्दाफाश झाला. भारत-पाकिस्तान सीमेवरील नियंत्रण रेषेवरून (Line of Control) जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांपर्यंत शस्त्रे पोहोचवण्याची प्रकरणे वाढली होती. त्या नेटवर्कमधील दहशतवादी संघटना ओव्हर ग्राउंड वर्कर (OGW) म्हणून महिलांची मदत घेत असल्याचे गुप्तचर संस्थांच्या अहवालातून उघड झाले आहे. अहवालानुसार, अलीकडेच पाकव्याप्त काश्मीर (PoK) मधील एका गावात ठेवलेला शस्त्रांचा मोठा साठा भारतीय सीमेवर पाठवण्याचा कट रचण्यात आला होता. हा साठा जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांपर्यंत पोहोचण्यासाठी महिला OGWs ला देण्यात आला होता.

LoC वर सक्रिय दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या महिला नियंत्रण रेषेवर तयार करण्यात आलेल्या घुसखोरी प्रतिबंधक प्रणाली (AIOS) च्या पलीकडे जम्मू-काश्मीरमध्ये ड्रोनद्वारे शस्त्रे पुरवण्याचे अनेक प्रयत्न यापूर्वी झाले आहेत. ज्यांना सीमेवर सक्रिय असलेल्या OGWच्या माध्यमातून दहशतवाद्यांपर्यंत शस्त्र पोहोचल्याची माहिती मिळत असते. सुरक्षा दलांच्या शोधात OGW अनेकदा पकडले जातात, परंतु सुरक्षा दलांना चकवण्यासाठी महिला OGW चा वापर केला जात आहे.

LoC चे सर्व मार्ग माहित असलेल्या काश्मिरींचा वापर

गुप्तचर संस्थेशी संबंधित एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानची ISI त्या काश्मिरींचा वापर करत आहे ज्यांना नियंत्रण रेषेच्या सर्व मार्गांची माहिती आहे आणि सीमा ओलांडून जम्मू-काश्मीरमध्ये शस्त्रे पाठवतात. अलीकडेच, लॉन्चिंग पॅडजवळील पीओकेच्या लिपा येथे राहणार्‍या लष्कराच्या 2 दहशतवाद्यांना शस्त्रांचा मोठा साठा जम्मू-काश्मीरमध्ये पाठवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यापैकी एक दहशतवादी कुपवाडा येथील रहिवासी आहे.

हे आधीही घडलंय...

भारतात दहशतवाद्यांना प्रवेश मिळण्याबरोबरच शस्त्रास्त्रांची खेप भारतात पाठवण्यासाठी स्थानिक दहशतवाद्यांचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. या वर्षी 5 मे रोजी राजौरीतील कुंडली जंगलात दहशतवाद्यांविरोधात कारवाई करत असलेल्या लष्करावर झालेल्या हल्ल्यामागे लष्कर कमांडर साजिद जुट गटाचा हात असल्याचा संशय लष्कराला होता. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कर कमांडर साजिद जुत उर्फ ​​हबीबुल्लाह मलिक आणि रफिक नई उर्फ ​​सुलतान, पाकव्याप्त काश्मीर (पीओके) च्या कोटली येथे बसून राजौरी हल्ल्याचा कट रचला होता. यासोबतच सीमेपलीकडून दहशतवाद्यांचे दोन गट भारतीय हद्दीत लष्करावर हल्ला करण्यासाठी दाखल झाले होते.

लष्कर कमांडर साजिद जुत आणि रफिक नाई याने 10-12 दहशतवाद्यांना दोन गटात भारतात घुसवण्याचा कट रचल्याचा गुप्तचर यंत्रणांना संशय आहे. 20 एप्रिल रोजी पुंछमध्ये लष्कराच्या ट्रकवर झालेल्या हल्ल्यासाठी यापैकी एक गट जबाबदार असल्याचे मानले जात होते. त्याचवेळी, सर्व दहशतवाद्यांना देशाच्या सीमेत घुसवण्याची जबाबदारी पीओकेमध्ये बसलेल्या दहशतवाद्यांनी रफिक नईवर सोपवली असल्याचा संशय एजन्सींना आहे. रफिक हा जम्मूचा रहिवासी असून त्याला घुसखोरीच्या मार्गांची पूर्ण माहिती आहे.  तेहरीक-उल-मुजाहिदीन/गझवानी कमांडर रफिक नाई, ज्याला सुलतान म्हणून ओळखले जाते, याला जम्मू आणि काश्मीरमध्ये पीओकेमधील दहशतवादी छावण्यांमध्ये प्रशिक्षण पूर्ण केलेल्या दहशतवाद्यांना घुसखोरी करण्याचे काम दिले जाते.

Web Title: pakistan conspiracy busted weapons are being sent to terrorists through active women ogws in kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.