पाकिस्तान नरक नाही म्हणणा-या अभिनेत्रीवर देशद्रोहाचा खटला
By admin | Published: August 23, 2016 12:56 PM2016-08-23T12:56:35+5:302016-08-23T12:56:35+5:30
अभिनेत्रीपासून ते नेतेपदापर्यंतचा प्रवास करणारी कन्नड अभिनेत्री राम्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो
Next
- ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 23 - अभिनेत्रीपासून ते नेतेपदापर्यंतचा प्रवास करणारी कन्नड अभिनेत्री राम्या यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या वक्तव्याला उत्तर देत पाकिस्तान नरक नसल्याचं राम्या बोलल्या होत्या. काँग्रेस पक्षाच्या सदस्य असलेल्या राम्या सार्कतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पाकिस्तानमध्ये गेल्या होत्या . यानंतर पाकिस्तान नरक नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं होतं.
'पाकिस्तान नरक नाही, तेथील लोकही आपल्यासारखेच आहेत. ते अत्यंत चांगली वागणूक देतात', असं वक्तव्य राम्या यांनी केलं होतं. राम्या यांचं वक्तव्य देशद्रोही असल्याचा आरोप करत के विठ्ठल गौडा यांनी न्यायालयात खटला दाखल केला आहे. वकील असणा-या गौडा यांनी राम्यावर भारताना अपमान केल्याचा तसंच पाकिस्तानची स्तुती करुन लोकांना भडकावल्याचा आरोप केला आहे.
Its freedom of speech, also our duty to speak on inclusiveness & peace.Curbing freedoms is wrong in democracy: Ramya pic.twitter.com/n4Q2OqejVU
— ANI (@ANI_news) August 23, 2016
राम्या यांच्या वक्तव्याचा अनेकांनी निषेध करत माफी मागण्याची मागणी केली आहे. मात्र राम्या यांनी आपण माफी मागणार नसल्याचं सांगितलं आहे. 'मी माफी मागणार नाही. मी काहीच चुकीचं केलेलं नाही. मी माझ्या मताशी ठाम आहे, आणि हीच लोकशाही आहे', असं राम्या बोलल्या आहेत. न्यायालयात शनिवारी याप्रकरणी सुनावणी होणार आहे.
I respectfully disagree, Pakistan is not hell, people there are just like us : Ramya Ex Congress MP pic.twitter.com/0l774hTZcu
— ANI (@ANI_news) August 23, 2016