शस्त्रसंधीचे उल्लंघन करून पाकने केला तोफगोळ्यांचा मारा, भारतीय लष्कराचेही चोख प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 06:04 AM2020-09-18T06:04:07+5:302020-09-18T06:23:50+5:30
जम्मू-काश्मीरमध्ये मंगळवारी पाकिस्तानने राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी येथे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर केलेल्या माऱ्यामध्ये भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला होता, तर दोन जण जखमी झाले होते.
जम्मू : जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यामध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गुरुवारी सकाळी पाकिस्तानच्या सैनिकांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करून तोफगोळ्यांचा मारा व गोळीबार केला. त्याला भारतीय लष्कराच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले.
यासंदर्भात लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, पाकिस्तानच्या सैनिकांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पूंछ जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगतच्या बालाकोट व मेंधार भागामध्ये तोफगोळ्यांचा मारा व गोळीबार केला. या महिन्यामध्ये पाकिस्तानी लष्कराने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून भारतीय हद्दीत मारा केल्याचे २४ प्रकार घडले आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये मंगळवारी पाकिस्तानने राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी येथे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर केलेल्या माऱ्यामध्ये भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला होता, तर दोन जण जखमी झाले होते. जखमींमध्ये एका लष्करी अधिकाºयाचा समावेश आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याआधी २ सप्टेंबर रोजी राजौरी विभागातील केरी येथे पाकिस्तानी लष्कराने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर केलेल्या माºयात भारतीय लष्कराचा अधिकारी शहीद झाला होता.
कोंडीत पकडण्याची रणनीती
चीनबरोबर तणावग्रस्त बनलेल्या भारताला कोंडीत पकडण्यासाठी पाकिस्ताननेही सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करून तोफगोळ्यांचा मारा, तसेच गोळीबार करण्याचे प्रमाण वाढविले.
पाकिस्तानने कोणतेही दु:साहस केले, तर त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा चीफ आॅफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपीन रावत यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता.
चीन व पाकिस्तान यांचे घनिष्ठ संबंध असून, त्या दोघांनी मिळून भारताला कोंडीत पकडण्याची चाल खेळली असल्याची चर्चा आहे.
पूर्व लडाखमधील गलवान खोºयात चीनच्या लष्कराचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला होता. त्यावेळी झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले होते.
यावेळी भारतीय जवानांनी पराक्रम गाजवत चीनच्या ६० सैनिकांना ठार केले होते, असे वृत्त अमेरिकेच्या एका साप्ताहिकाने नुकतेच प्रसिद्ध केले होते. चीनबरोबर पाकिस्तानने भारताच्या कुरापती काढण्याचे प्रकार सुरूच ठेवले आहेत.