पाकचा गोळीबार; एक जवान शहीद

By admin | Published: October 17, 2016 05:19 AM2016-10-17T05:19:37+5:302016-10-17T05:19:37+5:30

राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेवरील ठाण्यांवर पाकिस्तानने छोट्या शस्त्रांतून गोळीबार करून युद्धविरामचे उल्लंघन केले.

Pakistan firing; A young martyr | पाकचा गोळीबार; एक जवान शहीद

पाकचा गोळीबार; एक जवान शहीद

Next


जम्मू : राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेवरील ठाण्यांवर पाकिस्तानने छोट्या शस्त्रांतून गोळीबार करून युद्धविरामचे उल्लंघन केले. जवळपास एक आठवड्यानंतर पाकिस्तानने हे उल्लंघन केले. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारताकडूनही तसेच उत्तर दिले गेले. या चकमकीत एक भारतीय जवान शहीद झाला.
राजौरी जिल्ह्यातील नवशेरा विभागात नियंत्रण रेषेवर कोणतेही कारण नसताना पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला, असे संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने येथे सांगितले. या गोळीबारात कोणीही जखमी झालेले नाही.
भारताने २९ सप्टेंबर रोजी पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या लक्ष्यभेदी लष्करी कारवाईनंतर पाकिस्तानकडून २५ वेळा युद्धविरामचे उल्लंघन झाल्याची माहिती लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
पाकिस्तानकडून हेरगिरीच्या
उद्देशाने पाठविली गेल्याचे सांगितली जात असलेली १५० पेक्षा जास्त कबुतरे जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी जप्त केली. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले
गेले आहेत.
जम्मूतील विक्रम चौकात पाच आॅक्टोबर रोजी तीन लोकांना पकडण्यात आले होते. त्यांच्याकडील केळ््याच्या खोक्यात १५० कबुतरे आढळली. त्या तिघांवर जनावरांना क्रूर वागणूक प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून कबुतरे सेव्ह
(सेव्ह अ‍ॅनिमल्स, व्हॅल्यू एन्व्हायरमेंट) या स्वयंसेवी संस्थेकडे सोपविण्यात आली. सेव्हच्या अध्यक्षांना
या कबुतरांबाबत संशय आल्यामुळे त्यांनी जम्मुच्या उपायुक्तांना तसे
पत्र लिहिले. त्यानंतर हेरगिरीसाठी
या कबुतरांचा वापर केला जात आहे का या अंगाने चौकशी करण्याचा आदेश उपायुक्तांनी दिला.
(वृत्तसंस्था)
काश्मीर खोऱ्यातील अशांतता शंभर दिवसांची
हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुऱ्हान वानी हा सुरक्षा दलांसोबत चकमकीत ठार झाल्यानंतर काश्मीर खोऱ्यात सुरू झालेली अस्वस्थता व अशांतता रविवारी १०० दिवसांची झाली. अनेक दिवस संचारबंदीला तोंड दिलेल्या परिस्थितीत सुधारणा झाल्यामुळे आता खोरे संचारबंदीमुक्त आहे.
दक्षिण काश्मीरमध्ये ८ जुलै रोजी वानी चकमकीत ठार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून अस्वस्थेला सुरवात झाली. तेव्हापासून सुरक्षा दलांशी चकमकी, हिंसाचार, हल्ले यात दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह ८४ लोक ठार तर काही हजार जखमी झाले.
तेव्हापासून खोऱ्यात सतत बंद, हरताळ, हिंसाचारामुळे दैनंदिन व्यवहार जवळपास बंदच आहेत. हरताळ, बंद, मोर्चे, निदर्शने आदी मार्गांनी फुटीरवाद्यांनी आंदोलन सुरू ठेवले असून हे आंदोलन त्यांनी जेव्हा बंद केले तेव्हाच संचारबंदी शिथील झालेली आहे.
>सर्जिकल स्ट्राइक्सची माहिती उद्या संसद समितीला देणार
पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या महिन्यात लष्कराने केलेल्या लक्ष्यभेदी लष्करी कारवाईची (सर्जिकल स्ट्राईक्स) माहिती परराष्ट्र सचिव आणि लष्करी कारवायांचे महासंचालक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी
१८ आॅक्टोबर रोजी खासदारांच्या समितीला देतील.या समितीत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचाही समावेश
आहे. परराष्ट्र व्यवहारांवरील संसदेची ही स्थायी समिती खासदार शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखाली असून तिची
बैठक मंगळवारी होत आहे.

Web Title: Pakistan firing; A young martyr

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.