पाकमध्ये अन नरकात जाणे समानच!

By admin | Published: August 17, 2016 04:43 AM2016-08-17T04:43:39+5:302016-08-17T04:43:39+5:30

‘पाकिस्तानात जाणे आणि नरकात जाणे एकसमान आहे, दहशतवादाला उघड प्रोत्साहन देणारा पाकिस्तान स्वत:च त्याचे दुष्परिणाम भोगतो आहे’

In Pakistan, going to Hell is the same! | पाकमध्ये अन नरकात जाणे समानच!

पाकमध्ये अन नरकात जाणे समानच!

Next

सुरेश भटेवरा, नवी दिल्ली
‘पाकिस्तानात जाणे आणि नरकात जाणे एकसमान आहे, दहशतवादाला उघड प्रोत्साहन देणारा पाकिस्तान स्वत:च त्याचे दुष्परिणाम भोगतो आहे’. हे उद्गार आहेत संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकरांचे. पाकिस्तानबाबत मोदी सरकारने स्वातंत्र्यदिनापासून अत्यंत आक्रमक पवित्रा धारण केल्याचा हा दुसरा प्रसंग आहे.
दिल्लीजळील रेवाडी येथे मंगळवारी एका कार्यक्रमात बोलतांना संरक्षणमंत्री पर्रिकर म्हणाले, ‘काश्मिरच्या उरी सेक्टरमधे नियंत्रण रेषेतून भारतात घुसखोरी करणाऱ्या ५ दहशतवाद्यांना सैन्यदलाने सोमवारी यमसदनी पाठवले. गेल्या ३ सप्ताहात एलओसीजळ एकुण १२ दहशतवादी ठार झाले. सैन्यदलाने शेजारी राष्ट्राचा घुसखोरीचा चौथा प्रयत्न सोमवारी हाणून पाडला आहे. पाकिस्तान अंतर्बाह्य कमजोर आहे. थेट लढाई करण्याची या देशात ताकद नाही, म्हणून दहशतवादी पाठवून भारताला छोट्या जखमा करण्याचा खटाटोप पाकिस्तानतर्फे सातत्याने सुरू असतो. ’
चिन्मय मिशन व्दारा आयोजित कार्यक्रमात ३ दिवसांपूर्वी संरक्षणमंत्री पर्रिकर म्हणाले, ‘पाकिस्तान स्वत: दहशतवादाचा शिकार आहे. भारतात जेव्हा तो १0 दहशतवादी पाठवतो तेव्हा पाकिस्तानात कुठे ना कुठे बॉम्बस्फोट होतो आणि ७0/८0 लोक ठार झाल्याची बातमी येते’. भारताच्या ७0 व्या स्वातंत्र्यदिनी राष्ट्राला उद्देशून भाषण करतांना पंतप्रधानांनी पाक व्याप्त काश्मीर व बलुचिस्तान यांचा थेट उल्लेख करीत पाककडून तिथे मानवाधिकाराचे कसे उल्लंघन सुरू आहे, याचा संदर्भ अधोरेखित केला होता.
गृहमंत्री राजनाथसिंग सार्क देशांच्या गृहमंत्र्यांच्या बैठकीसाठी इस्लामाबादला गेले. त्यांना भारतात न जेवताच २0 तासात परत यावे लागले. पाकिस्तानचे गृहमंत्री निसार अली खान चौधरी यावेळी राजनाथसिंगांशी राजशिष्टाचार सोडून वागले. आता येत्या २५ व २६ आॅगस्ट रोजी पाकिस्तानातल्या सार्क देशांच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीला अरूण जेटली जाणार की नाही? हा विषयाबाबत तूर्त प्रश्नचिन्ह आहे.


काश्मिरात पुन्हा संघर्ष; पाच ठार
1काश्मिरातील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी एकीकडे प्रयत्न केले जात असतानाच मंगळवारी बडगाम आणि अनंतनाग जिल्ह्यात दगडफेक करणाऱ्या आंदोलकांवर ‘सीआरपीएफ’कडून झालेल्या गोळीबारात पाच जण ठार झाले, तर अतिरेक्यांच्यग हल्ल्यात सीआरपीएफचा एक अधिकारी शहीद झाला. खोऱ्यातील परिस्थिती पुन्हा चिघळली असून, काही भागांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. काश्मिरातील जनजीवन सलग ३९ व्या दिवशीही विस्कळीत झालेले आहे. 2हिज्बुलचा कमांडर बुरहान वनी चकमकीत मारला गेल्यानंतर काश्मिरात महिनाभरापासून संघर्ष उफाळला आहे. आतापर्यंत या संघर्षात ६७ जण मृत्युमुखी पडले आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, बडगाम जिल्ह्यात मागमच्या अरीपठाण भागात मंगळवारी सकाळी दगडफेक करणाऱ्या आंदोलकांवर सीआरपीएफच्या जवानांनी गोळीबार केला.
3यात चार जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले आहेत. मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांत जावेद अहमद, मंजूर अहमद, मोहम्मद अशरफ आणि कौसर शेख यांचा समावेश आहे. या जमावाने अगोदर सीआरपीएफच्या वाहनावर दगडफेक केली. 4अनंतनाग जिल्ह्यात जानग्लात मंडी येथे झालेल्या अन्य एका घटनेत पाच जण जखमी झाले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, दगडफेक करणाऱ्या तरुणांना पांगविण्यासाठी सुरक्षा दलाला गोळीबार करावा लागला. यात जखमी झालेल्या आमीर युसूफ या तरुणाचा नंतर मृत्यू झाला. श्रीनगर, अनंतनागमध्ये संचारबंदी : श्रीनगर जिल्ह्यात आणि अनंतनाग शहरात संचारबंदी आहे. गोळीबाराच्या घटनांत जे नागरिक मृत्युमुखी पडत आहेत त्याच्या निषेधार्थ फुटीरवाद्यांनी उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची ही कृती हाणून पाडण्यास संचारबंदी लागू केली आहे.


प्रशिक्षित दहशतवादी, शस्त्रे आणि स्फोटके भारतात पाठविणारे पाकिस्तान स्वत:ही त्यांच्या देशातील दहशतवादी कारवायांनी होरपळून निघात आहे. पाकिस्तानच्या संसदेत मांडलेल्या सन २०१५-१६ साठीच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात दिलेल्या माहितीनुसार गेल्या १५ वर्षांत पाकिस्तानला ११८अब्ज डॉलर एवढी दहशतवादाची प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष किंमत मोजावी लागली आहे. जिन्ना इन्स्टिट्यूटने तर केलेल्या ‘स्टेट आॅफ रिलिजियस फ्रीडम इन पाकिसतान’ या -अहवालानुसार सन २०१२ ते २०१५ दरम्यान तेथे अल्पसंख्य समाजाविरुद्ध हिंसाचाराच्या ३५१ घटना घडल्या. खासकरून सिंध आणि बलुचिस्तान प्रांतांत अल्पसं्नख़्य समाजास लक्ष्य करून हत्या करण्याच्या व शिया समुदायाविरुद्ध बॉम्बस्फोट करण्याच्या घटना घडल्या. साऊथ एशिया टेररिझम पोर्टलनुसार सन २०१५ मध्ये एकूण २४७ नागरिक हिंसाचारात मारले गेले. त्यापैकी ११४ दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ठार झाले तर १४३ सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत मारले गेले.


नवी दिल्ली : गेल्या २५ वर्षांत सीमेपलिकडे प्रशिक्षण घेऊन भारतात घुसखोरी केलेले पाच हजार अतिरेकी सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत ठार झाले. ही संख्या लष्करातील दोन बटालियनमधील सैनिकांएवढी आहे. गेल्या शुक्रवारी जम्मू-काश्मीरच्या प्रश्नावर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिली. ‘इंडियास्पेन्ड’ने काश्मीरमधील दहशतवादासंबंधी विविध स्रोतांतून उपलब्ध झालेल्या माहितीचे संकलन केले आहे. त्यात सर्वपक्षीय बैठकीत दिल्या गेलेल्या या माहितीचा समावेश आहे.

Web Title: In Pakistan, going to Hell is the same!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.