भारतीय चौक्या उद्ध्वस्त केल्याचा पाकिस्तानचा "तो" व्हिडीओ बनावट

By admin | Published: May 24, 2017 09:57 PM2017-05-24T21:57:29+5:302017-05-24T21:57:29+5:30

गेल्या काही दिवसांपासून सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती वाढत आहेत

Pakistan has "spoofed" the video of the Indian chowk | भारतीय चौक्या उद्ध्वस्त केल्याचा पाकिस्तानचा "तो" व्हिडीओ बनावट

भारतीय चौक्या उद्ध्वस्त केल्याचा पाकिस्तानचा "तो" व्हिडीओ बनावट

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - गेल्या काही दिवसांपासून सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती वाढत आहेत. भारतीय जवानांच्या शिरच्छेदाचेही अनेक प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे भारतीय लष्कर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याची भाषा करत होते. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय जवानांनी नौशेरातील पाकिस्तानच्या हद्दीतील चौक्या नेस्तनाबूत केल्या होत्या. त्याचा एक व्हिडीओही व्हायरल केला होता. मात्र भारतानं पाकव्याप्त काश्मीरमधल्या चौक्या उद्ध्वस्त केल्याचा दावा पाकिस्तानी लष्कराने फेटाळला होता. त्यानंतर पाकिस्ताननंही भारताच्या चौक्या उद्ध्वस्त केल्याचा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला होता.

मात्र पाकिस्ताननं दिलेला हा व्हिडीओ बनावट असल्याचं आता सिद्ध झालं आहे. पाकिस्तानचा हा खोटारडेपणा भारतीय लष्कराने उघड करत पाकिस्तानला तोंडघाशी पाडलं आहे. पाकिस्तानकडून जारी करण्यात आलेला तो व्हिडीओ बनावट असल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे. राजौरी सेक्टरमधील नौशेरातील भारतीय चौक्या उडवल्याचा पाकिस्ताननं केलेला दावा भारतानं खोडून काढला आहे. भारतीय चौक्यांना उडवणे शक्य नसल्याचं भारतीय लष्कराच्या सूत्रांनी सांगितलं आहे. भारतीय चौक्यांच्या संरक्षक भिंती खूपच मजबूत आहेत. त्या भिंती नेस्तनाबूत करणं जवळजवळ अशक्य आहे.

आयईडी स्फोटांच्या माध्यमातूनच भारतीय चौक्या उडवणं शक्य आहे.  हा व्हिडीओत ब-याच ठिकाणी एडिट केल्याचं पाहायला मिळतं आहे. पाकिस्तानने जारी केलेल्या या व्हिडिओत चौक्यांची संरक्षक भिंत कोसळल्याची पाहायला मिळते आहे. या 1 मिनिट 28 सेकंदांच्या व्हिडीओमध्ये धूर आणि धुळीचे लोळ सर्वत्र दिसत आहेत. भारतीय लष्कराने राजौरीतील नौशेरा सेक्टरमधील पाकिस्तानी सैन्याच्या चौक्या उडवल्यापासून पाकिस्तान बिथरला आहे. भारताच्या या जबरदस्त कारवाईमुळे भडकलेल्या पाकने सियाचीनमधून लढाऊ विमानाचे उड्डाण केल्याचा दावा केला होता. मात्र, भारतीय हवाई दलाने पाकचा हा दावा फेटाळला असून, भारतीय हद्दीतून अशा कोणत्याही लढाऊ विमानाचे उड्डाण झाले नसल्याचे हवाई दलाने स्पष्ट केले आहे.
 

Web Title: Pakistan has "spoofed" the video of the Indian chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.