"पाकिस्तानातही पंतप्रधान नरेंद्र मोदींची क्रेझ, त्यांच्या कामाने इम्प्रेस झालेत फॅन्स"

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 02:06 PM2023-12-08T14:06:29+5:302023-12-08T14:07:20+5:30

अंजू म्हणते की, तिथल्या लोकांना पंतप्रधान मोदी खूप आवडतात आणि तिथे त्यांचे खूप चाहते आहेत. पाकिस्तानच्या लोकांना नरेंद्र मोदींसारखा नेता हवा आहे.

pakistan huge craze for pm modi indian prime minister narendra modi revealed anju | "पाकिस्तानातही पंतप्रधान नरेंद्र मोदींची क्रेझ, त्यांच्या कामाने इम्प्रेस झालेत फॅन्स"

"पाकिस्तानातही पंतप्रधान नरेंद्र मोदींची क्रेझ, त्यांच्या कामाने इम्प्रेस झालेत फॅन्स"

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुगलवर सर्वाधिक सर्च केले जाणारे नेते आहेत. ते जगभर प्रचंड लोकप्रिय आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनाही त्यांनी याबाबत मागं टाकलं आहे. सप्टेंबरमध्ये ग्लोबल रेटिंग अ‍ॅप्रूव्हलने जाहीर केलेल्या जगभरातील लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पंतप्रधान मोदी पहिल्या स्थानावर आहेत. पाकिस्तानातही मोदींचे फॅन्स आहेत. 

29 नोव्हेंबरला पाकिस्तानातूनभारतात परतलेल्या अंजूने याबाबत खुलासा केला आहे. अंजू भारतात परतल्यापासून ती पाकिस्तानातील लोकांबद्दल आणि तिच्या अनुभवांबद्दल नवनवीन गोष्टी शेअर करत आहे. अंजू म्हणते की, तिथल्या लोकांना पंतप्रधान मोदी खूप आवडतात आणि तिथे त्यांचे खूप चाहते आहेत. पाकिस्तानच्या लोकांना केंद्रात नरेंद्र मोदींसारखा नेता हवा आहे.

टाईम्स नाऊ नवभारतला दिलेल्या मुलाखतीत अंजूने सांगितले की, तिचे पाकिस्तानातील फेसबुक मित्र नसरुल्लाहसोबत राजकारणाबाबत कोणतेही संभाषण झाले नाही, परंतु तेथे राहिल्यानंतर तिला कळले की पाकिस्तानच्या लोकांना भारतीय पंतप्रधान खूप आवडतात. मोदी आणि भारताबद्दल जाणून घेण्यासाठी पाकिस्तानच्या लोकांना खूप उत्सुकता आहे. 

अंजूला लोकं पीएम मोदींबद्दल अनेक प्रश्न विचारायचे. अंजूने असा दावाही केला की, पाकिस्तानी लोकांना वाटते की त्यांच्या देशालाही पंतप्रधान मोदींसारख्या नेत्याची गरज आहे जेणेकरून पाकिस्तानचाही विकास होईल.यावर्षी 21 जुलै रोजी अंजू कुटुंबीयांना न सांगता पाकिस्तानात गेली होती. भारतात अंजूचा पती आणि दोन मुलं आहेत. 

"मी माझ्या मर्जीने पाकिस्तानात गेली..."; पोलिसांनी अंजूला विचारले 12 प्रश्न

पाकिस्तानातूनभारतात परतल्यानंतर अंजू पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अंजूची चौकशी करण्यासाठी राजस्थानमधील भिवडी येथील पोलीस हरियाणातील सोनीपतला पोहोचले. यावेळी पोलिसांनी अंजूला 12 प्रश्न विचारले, अंजूच्या जबाबाचे व्हिडीओ रेकॉर्डिंगही करण्यात आले आहे. 

अंजूने पोलिसांना सांगितलं की, ती स्वतःच्या मर्जीने पाकिस्तानात गेली होती. तिचे पती अरविंद याच्याशी मतभेद होते. भिवडीचे एसपी योगेश दाधीच यांनी सांगितलं की, अंजूचा पती अरविंद याने दाखल केलेल्या एफआयआरबाबत अंजूची चौकशी करण्यासाठी तपास अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलं होतं. या दरम्यान अंजूसोबत जी काही चौकशी झाली त्याची नोंद करण्यात आली आहे
 

Web Title: pakistan huge craze for pm modi indian prime minister narendra modi revealed anju

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.