अफगाण सेनेकडून तालिबानच्या डिप्टी चीफ उमरीचा खात्मा; पाकिस्तानकडून परिस्थितीबाबत अमेरिकेला दोष

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 07:49 AM2021-07-29T07:49:41+5:302021-07-29T07:52:20+5:30

Afghanistan Taliban Issue : पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून अमेरिकेवर टीका. अमेरिकेमुळेच अफगाण समस्या गुंतगुंतीची झाल्याचा केला आरोप.

pakistan imran said america is completely guilty for the afghan problem many top taliban terrorists killed in the war | अफगाण सेनेकडून तालिबानच्या डिप्टी चीफ उमरीचा खात्मा; पाकिस्तानकडून परिस्थितीबाबत अमेरिकेला दोष

अफगाण सेनेकडून तालिबानच्या डिप्टी चीफ उमरीचा खात्मा; पाकिस्तानकडून परिस्थितीबाबत अमेरिकेला दोष

Next
ठळक मुद्देपाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून अमेरिकेवर टीका.अमेरिकेमुळेच अफगाण समस्या गुंतगुंतीची झाल्याचा केला आरोप.

अफगाणिस्तानात तालिबान आणि अफगाण लष्करात सुरू असलेल्या युद्धादरम्यान गेल्या चोवीस तासांत पकतिया प्रांतात तालिबानचा डिप्टी चीफ अब्दुल हक उमरीचा अफगाण लष्करानं खात्मा केला. अब्दुल हक दोहामध्ये अफगाण सरकारशी चर्चेत भाग घेत असलेल्या एका तालिबानी नेत्याचा मुलगा आहे. याशिवाय तालिबानता मुख्य दहशतवादी मुल्ला शरीफलादेखील अफगाण सैन्यानं कंठस्नान घातलं. अफगाण समस्येचं सैन्य हे समाधान असू शकत नाही, असं दुसरीकडे अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटलं.

दरम्यान, दोहामध्ये सुरू असलेल्या चर्चेत भाग घेत असलेल्या तालिबानच्या अनस हक्कानी याने ट्वीट करत या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसंच अब्दुल हक हा चर्चेत सहभागी असलेल्या मोहम्मद नबी उमरीचा मुलगा असल्याचंही त्यानं सांगितलं. मोहम्मद नबी उमरी हा ग्वांतानामो तुरूंगात होता. त्याची २०१५ मध्ये सुटका करण्यात आली होती. त्यासोबत सोडण्यात आलेले अन्य चार कैदीही अफगाण सरकारसोबत दोहा येथील चर्चेत सहभागी आहेत. एएनआयच्या वृत्तानुसार जौजान प्रांतात सुरू असलेल्या युद्धादरम्यान तालिबानच्या मुख्य दहशतवादी मुल्ला शरीफलाही कंठस्थान घालण्यात आलं. 

पाकिस्तानचा अमेरिकेवर आरोप
अफगाणिस्तानातील परिस्थितीवरून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिकेवर निशाणा साधला. तसंच अमेरिकेमुळेच अफगाणिस्तानमधील समस्या गुंतागुंतीची झाल्याचं म्हटलं. सर्व पक्षांच्या राजकीय समस्यांच्या निराकरणातूनच ही समस्या सोडवली जाऊ शकत असल्याचं त्यांनी नमूद केलं.

वृत्ताला दुजोरा
प्रातीय गव्हर्नर मोहम्मद रेजा गफुरी यांनीदेखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. शबरगान मजार हायवेवर सिक्युरिटी पोस्टवर झालेल्या संघर्षादरम्यान मुल्ला शरीफचा खात्मा करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. केवळ सैन्याच्या जोरावर अफगाण समस्येवर तोडगा काढला जाऊ शकत नाही. आमचं सरकार तालिबानशी शांतता आणि युद्ध थांबवण्याबाबत थेट चर्चेसाठी तयार आहे. आम्ही पाच हजार तालिबांनींना सोडून शांततेचा संदेश यापूर्वीच दिला असल्याचं अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी म्हणाले.

Web Title: pakistan imran said america is completely guilty for the afghan problem many top taliban terrorists killed in the war

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.