मोठं षडयंत्र! POKमध्ये पाक सैन्याच्या हालचाली वाढल्या, चीन घातपाताच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 09:46 AM2020-07-05T09:46:48+5:302020-07-05T09:48:23+5:30
नियंत्रण रेषेला लागून असलेल्या भागात पाकिस्तानने आपली शक्ती दुप्पट वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.
नवी दिल्लीः पूर्व लडाखमधील LACवर भारत अन् चीनमध्ये तणाव निर्माण झाल्याने पाकिस्तानने नियंत्रण रेषेवरील आपल्या सैन्य हालचाली वाढवल्या आहेत. पुंछलगतच्या पीओके भागात पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केले आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील कोतली, रावलाकोट, विंभर, बाग, मुझफ्फराबाद यासह अनेक ठिकाणी पाकिस्ताननं अतिरिक्त बटालियन तैनात केल्या आहेत. नियंत्रण रेषेला लागून असलेल्या भागात पाकिस्तानने आपली शक्ती दुप्पट वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गलवान खोऱ्यातील भारत आणि चीनमधील संघर्षानंतर पाकिस्तानने पीओकेमधील कोतली येथे तीन ब्रिगेडसह 28 पीआर (पाकिस्तान रेजिमेंट) आणि 40 आरटी तैनात केले आहेत. त्याशिवाय रावलाकोट येथे 2 ब्रिगेडसह 9 पीआर, विंभर येथे तैनात 4 ब्रिगेडसह 15 लाइट इन्फ्रंटीला कार्यरत केले आहे. ६ ब्रिगेडसह 22 पीआर आणि 10 एनएलआय (नॉर्दर्न लाइट इन्फंट्री) आणि ५ ब्रिगेड, 21 सिंध रेजिमेंट बागेवर तैनात आहेत.
त्याचप्रमाणे मुझफ्फराबादमधील डोमेल येथे एका ब्रिगेडसह 35 पीआर, मुझफ्फराबादच्या जरी कस्स येथे ७ ब्रिगेडसह २१ एके बॅट्री आणि सियाचीनमध्ये ८० ब्रिगेडसह ७२ पीआरला तैनात करण्यात आले आहे. इराण सीमेवर पीआर तैनात करण्यात आले होते, तेथून त्यांना पीओके येथे हलविण्यात आले आहे. एलएसीवरील परिस्थितीचा फायदा घेत एलओसीवर दबाव आणण्यासाठी हा सर्व प्रयोग केला जात आहे. नियंत्रण रेषेवरील कोणतेही मोठे षडयंत्र पाकिस्तान अंमलात आणू शकते.
सूत्रांच्या माहितीनुसार, गलवान खो-यातील घटनेनंतर पाकिस्ताननेही पीओकेमध्ये लष्करी हालचाली वाढवल्या आहेत. यात नियंत्रण रेषा पलिकडील पाकव्याप्त काश्मीरमध्ये रात्रभर दिवे विझवून पाकिस्तानी लष्कराची वाहनं आणली जात असल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानी सैनिकांच्या हालचाली वाढवण्यात चीनचा मोठा हात आहे. चीन भारताला दुहेरी मार्गाने घेरण्याचा प्रयत्नात आहे. या कारणास्तव त्यांनी नियंत्रण रेषेवरील लष्करी जमवाजमव वाढवण्यासाठी पाकिस्तानला प्रोत्साहन दिले आहे. तणावाच्या परिस्थितीत पाकिस्तान नियंत्रण रेषेवरील मोठा षडयंत्र रचण्याचा प्रयत्नदेखील करू शकेल.
हेही वाचा
देशाला विकासासाठी पंचसूत्रीची गरज; तरच अर्थव्यवस्था सुधारेल- नितीन गडकरी
मोदींच्या शुभेच्छांवर ट्रम्प म्हणाले; "थँक्यू माझ्या मित्रा, अमेरिका भारतावर प्रेम करतो"
मुसळधार पावसानं लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हर फ्लो; संततधार कायम