संताप आणणारं कृत्य ! कुलभूषण जाधव यांच्या पत्नी-आईचा अपमान करणा-या पत्रकारांची पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयानं थोपटली पाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2017 09:51 AM2017-12-28T09:51:08+5:302017-12-28T11:44:32+5:30

कुलभूषण जाधव व त्यांच्या कुटुंबीयांसोबत पाकिस्तानातील पत्रकारांनी केलेल्या गैर वर्तणुकीनंतर पाकिस्तानचा आणखी एक घाणेरडा चेहरा समोर आला आहे.

Pakistan ministry sends thank you note to journalists who heckled kulbhushan jadhavs mother wife | संताप आणणारं कृत्य ! कुलभूषण जाधव यांच्या पत्नी-आईचा अपमान करणा-या पत्रकारांची पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयानं थोपटली पाठ

संताप आणणारं कृत्य ! कुलभूषण जाधव यांच्या पत्नी-आईचा अपमान करणा-या पत्रकारांची पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयानं थोपटली पाठ

Next

नवी दिल्ली - पाकिस्तानच्या ताब्यात असलेले कुलभूषण जाधव व त्यांच्या कुटुंबीयांसोबत पाकिस्तानातील पत्रकारांनी केलेल्या गैर वर्तणुकीनंतर पाकिस्तानचा आणखी एक घाणेरडा चेहरा समोर आला आहे. मीडिया रिपोर्टसनुसार, कुलभूषण जाधव यांच्या पत्नी व आई यांचा अपमान होईल, त्यांना त्रास होईल, असे प्रश्न विचारणा-या पत्रकारांची पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयानं पाठ थोपटली आहे. पाकिस्ताननं या पत्रकारांना चक्क थँक यू म्हटल्याचे माहिती समोर आली आहे.

हेरगिरी आणि विध्वंसक कारवाया केल्याच्या आरोपावरून फाशीची शिक्षा झालेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी त्यांची पत्नी व आई सोमवारी (25 डिसेंबर) पाकिस्तानात गेल्या होत्या. कुलभूषण यांच्या पत्नी व आई या दोघी सोमवारी इस्लामाबादमध्ये जाधव यांना भेटल्या तेव्हा त्यांना कशी अपमानास्पद वागणूक दिली गेली, याचे सविस्तर निवेदन भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी जारी केले होते.  

यावेळी या दोघींना पाकिस्तानातील पत्रकारांचा शाब्दिक हल्लादेखील सहन करावा तसंच पत्रकारांनी उलट-सुलट प्रश्न विचारत त्यांना त्रासदेखील दिला. इस्लामाबादमध्ये कुलभूषण जाधव यांच्यासोबत भेट झाल्यानंतर त्यांच्या पत्नीला एका पत्रकारानं विचारलं की, “तुमच्या पतीनं हजारो निष्पाप पाकिस्तानी नागरिकांच्या हत्या करुन त्यांच्या रक्ताची होळी खेळली आहे, यावर तुमचं काय म्हणणं आहे.?  (आपके पतिदेव ने हजारों बेगुनाह पाकिस्तानियों के खून से होली खेली है, इसके बारे में क्या कहती हैं आप?' ), तर कुलभूषण जाधव यांच्या आईला, 'गुन्हेगार मुलाला भेटून तुम्हाला कसं वाटत आहे?'  (अपने कातील बेटे से मिलने के बाद आपके क्या जजबात हैं? ), असे अपमानास्पद प्रश्न  पाकिस्तानी मीडियानं विचारले.

वृत्तवाहिनी 'टाइम्स नाऊ'नं दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानी पत्रकारांकडून जाधव कुटुंबीयांना मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीबाबत त्यांचे कान उघाडणी करण्याऐवजी पाकिस्तानी सरकारनं चक्क त्यांना धन्यवाद केल्याची धक्कादायक व संतापजनक माहिती समोर आली आहे. 'तुम्ही लोकांनी खूप चांगले काम केले', असं म्हणत पाकिस्तानी सरकारनं पत्रकारांची पाठ थोपटली आहे.  

जाधव यांच्या पत्नीच्या बुटात म्हणे ‘धातूची वस्तू’  - पाकचा कांगावा
शिवाय, कुलभूषण जाधव यांच्या पत्नी जे बूट घालून आल्या होत्या त्यात ‘धातूची संशयास्पद वस्तू’ आढळली म्हणून त्यांना ते बूट भेटीनंतर परत दिले गेले नाहीत, असा कांगावा पाकिस्तानने केला आहे. भेटीनंतर जाधव यांच्या पत्नीची पादत्राणे वारंवार विनंती करूनही परत दिली गेली नाहीत, याचा उल्लेख होता. असे करण्यामागे पाकिस्तानचा काही वाईट हेतू असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही भारताने दिला होता.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. मोहम्मद फैजल यांनी भारताच्या या निवेदनावर प्रतिक्रिया देताना अशी मखलासी केली की, जाधव यांची पत्नी जे बूट घालून आली होती त्यात एक संशयास्पद धातूची वस्तू आढळली. ती नेमकी काय आहे याची ‘फॉरेन्सिक तपासणी’ करण्यासाठी त्यांचे बूट ठेवून घेण्यात आले व त्यांना घालायला लगेच दुसरी पादत्राणे देण्यात आली.

जाधव यांच्या आई व पत्नीला भेटीसाठी जाताना मंगळसूत्र, बांगड्या व कपाळाची टिकलीही काढून ठेवायला सांगून पाकिस्तानने त्यांच्या धार्मिक व सांस्कृतिक भावनांचा अनादर केला, असे भारताचे म्हहणे होते. शिवाय त्या दोघींना घालून आलेले कपडे बदलून आत जायला सांगितले, असेही भारताने म्हटले होते. कथित सुरक्षेच्या कारणास्तव असे करण्याची काय गरज होती याचा खुलासा न करता डॉ. फैजल फक्त एवढेच म्हणाले की, या दोघींना भेटीसाठी जाताना जे जे काढून ठेवायला सांगितले गेले ते सर्व त्यांना भेटीनंतर परत देण्यात आले.
काचेच्या तावदानाआडून घडविलेली भेट, त्यावेळी भारताचे उप उच्चायुक्त जे. पी. सिंग यांना आणखी एका काचेमागे उभे केले जाणे व पाकिस्तानी पत्रकारांना जाधव यांच्या आई व पत्नीच्या जवळ जाऊ दिल्याने त्यांच्याकडून या दोघींना उद्देशून आक्षेपार्ह विधाने केली जाणे, असे इतर आक्षेपही भारताने नोंदविले होते. त्या प्रत्येकाला उत्तर न देता पाकिस्तानने अशी भूमिका घेतली की, या सर्व बाबतीत त्याच वेळी हरकत घेता येऊ शकली असती. २४ तास उलटल्यानंतर या गोष्टींची वाच्यता करणे ही पश्चातबुद्धाने केलेली वायफळ बडबड आहे व त्यासंदर्भात भारताच्या तोंडाला लागण्याची आमची इच्छा नाही!  

Web Title: Pakistan ministry sends thank you note to journalists who heckled kulbhushan jadhavs mother wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.