पाकिस्तानला जबर धक्का, इस्लामाबादमध्ये होणारं सार्क संमेलन रद्द?
By admin | Published: September 28, 2016 05:20 PM2016-09-28T17:20:42+5:302016-09-28T17:20:42+5:30
पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये होणारं 19 वं 'सार्क' संमेलन रद्द होण्याची दाट शक्यता आहे. नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानच्या राजधानीत होणा-या सार्क संमेलनावर भारताने बहिष्कार
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28- पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये होणारं 19 वं 'सार्क' संमेलन रद्द होण्याची दाट शक्यता आहे. नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानच्या राजधानीत होणा-या सार्क संमेलनावर भारताने बहिष्कार टाकला असून शेजारील देश बांगलादेश, अफगाणिस्तान आणि भूतान यांनी देखील संमेलनात भाग घेणार नसल्याचं वृत्त समोर येत आहे.
दहशतवादाच्या मुद्द्यावरून या तीन देशांनी इस्लामाबादमध्ये होणा-या सार्क संमेलनाला विरोध केला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या जागी दुस-या ठिकाणाची निवड करावी अशी मागणी करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. पाकिस्तानला एकटं पाडण्यासाठी बनविण्यात आलेल्या रणनितीचा हा एक मोठा हिस्सा असू शकतो. दक्षिण आशियातील 8 देशांच्या या संमेलनात आता पाकिस्तानसोबत केवळ नेपाळ, श्रीलंका आणि मालदीव हेच देश आहेत.