मोदी सरकारच्या PoK प्लॅनमुळे पाकिस्तानला धडकी; अजित डोवाल 'अॅक्शन मोड'मध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 11:46 AM2020-05-11T11:46:04+5:302020-05-11T11:49:10+5:30
भारत पाकव्याप्त काश्मीरसंदर्भात काही तरी मोठी कारवाई करण्याच्या तयारी असल्याची कल्पना इम्रान खान यांना आली असून, ते भीतीच्या सावटाखाली आहेत.
नवी दिल्ली : भारत सरकारनं गिलगिट-बाल्टिस्तानच्या हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यास सुरुवात केल्यापासून काही तरी मोठं घडणार, अशी भीती पाकिस्तानला सतावते आहे. पाकव्याप्त काश्मीरसंदर्भात भारताच्या अनेक कृती योजना पुढे येत असल्यानं पाकिस्तानला धडकीच भरली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची पीओकेबाबत एक मोठी बैठक झाली. त्यामुळे कोरोनाच्या संकटकाळातच पाकव्याप्त काश्मीर भारतात येणार का, असं आशादायी चित्र निर्माण झालं आहेत. भारतीय लष्कराच्या आक्रमक पवित्र्यामुळे पाकिस्तान सैन्याची भंबेरी उडाली असून, इम्रान खानही आता भारताविरोधात जगाचे दार ठोठावत आहेत. भारत पाकव्याप्त काश्मीरसंदर्भात काही तरी मोठी कारवाई करण्याच्या तयारी असल्याची कल्पना इम्रान खान यांना आली असून, ते भीतीच्या सावटाखाली आहेत.
झी मीडियाच्या वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि सीडीएस जनरल बिपीन रावत यांची एक संयुक्तिक बैठक झाली असून, पाकव्याप्त काश्मीरला पाकिस्तानपासून कसं मुक्त करता येईल, यासाठी एक योजना तयार केल्याची चर्चा आहे. देशाच्या या चार प्रमुख नेत्यांमध्ये पाकव्याप्त काश्मीरला पुन्हा भारताला जोडण्यासाठी खलबतं सुरू असून, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. डोवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सैन्य प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे, रॉ चीफ, आयबी चीफ, नॉर्दन आर्मी कमांडचे लेफ्टनंट जनरल वाय. के. जोशी, 15 कोर के जीओसी लेफ्टिनंट जनरल राजू, 16 कोर कमांडचे लेफ्टिनंट जनरल हर्ष गुप्ता यांच्यासह जम्मू-कश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह देखील उपस्थित होते. 5 तासांच्या मॅरेथॉन बैठकीत जम्मू-काश्मीर तसेच नियंत्रण रेषेच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.
डोवाल यांना खोऱ्यात उपस्थित असलेल्या दहशतवाद्यांची यादी देण्यात आली आहे. जैश-ए-मोहम्मदचे 25-30 दहशतवादी काश्मीरमध्ये उपस्थित असलेल्या सुरक्षा दलांवर हल्ला करण्याचा कट रचू शकतात, अशी माहिती अधिकाऱ्यांनी डोवाल यांना दिली. पाकिस्तानने काश्मीरमधील पीओके आणि मोठ्या प्रमाणात नियंत्रण रेषेजवळील दुधाणियाल, शारदा आणि आठकाम येथे अतिरेक्यांचे प्रक्षेपण पॅड सक्रिय केले आहेत. दहशतवादी घुसखोरीचे षडयंत्र रचत आहेत. त्या पार्श्वभूमीवर डोवाल यांनी पूर्ण पाकव्याप्त काश्मीरच ताब्यात घेण्याचा प्लॉन आखला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी एक अखंड भारताचे स्वप्न पाहिले होते. ते स्वप्न 2020 मध्ये पूर्ण होणार आहे का?, अशी उत्कंठा सगळ्यांना लागून राहिली आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News :आम्ही उद्ध्वस्त झालोय, मदत करा; इम्रान खान यांच्या अर्थ सल्लागाराची कबुली
Lockdown News: "शहरातील 'त्यांना' बाहेरचे समजतात अन् गावात कोरोनाच्या भीतीनं प्रवेश मिळत नाही"
"आताचं संकट मोदींना झेपणारं नाही; त्यांनी सर्वपक्षीय सरकार स्थापन करावं"
Lockdown News: आजपासून ५ दिवसांसाठी मोदी सरकारची योजना; घरबसल्या करा स्वस्तात सोनं खरेदी!
पाक दहशतवादी आज काश्मीरमध्ये मोठा हल्ला करण्याची शक्यता; ११ मे हाच दिवस का निवडला?
ड्रॅगन संपूर्ण एव्हरेस्ट गिळंकृत करायच्या मार्गावर; नेपाळनं उठवला आवाज