पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, भारताने LoC वर रोखला व्यापार 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 05:31 PM2019-03-13T17:31:04+5:302019-03-13T18:05:01+5:30

भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर सुद्धा पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. बुधवारी पाकिस्ताने पुन्हा पुंछ परिसरात शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेजवळ मोठ्याप्रमाणात गोळीबार करण्यात आला.

pakistan poonch sector ceasefire violation jammu kashmir | पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, भारताने LoC वर रोखला व्यापार 

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, भारताने LoC वर रोखला व्यापार 

Next

पुंछ : भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर सुद्धा पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. बुधवारी पाकिस्ताने पुन्हा पुंछ परिसरात शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेजवळ मोठ्याप्रमाणात गोळीबार करण्यात आला. यामुळे स्थानिक नागरिकांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

दरम्यान, पाकिस्तानच्या या नापाक हरकतीला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. नियंत्रण रेषेवरील (एलओसी) ट्रेड सेंटरवरच पाकिस्तानने शेल्सचा मारा केल्याने एलओसीवरील भारत-पाकिस्तान दरम्यानचा व्यापार बंद करण्यात आला आहे. याआधी पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील व्यापार बंद करण्यात आला होता. 

गेल्या महिन्यात पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये घुसून भारताने दहशतवाद्यांच्या तळांवर कारवाई केली होती. तेव्हापासून जम्मू-काश्मीर सीमा भागात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. जम्मू-काश्मीरमधील पुंछ, राजौरीसह नियंत्रण रेषेजवळील सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येत आहे.   

Web Title: pakistan poonch sector ceasefire violation jammu kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.