पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, 7 जणांचा मृत्यू
By admin | Published: November 1, 2016 10:00 AM2016-11-01T10:00:04+5:302016-11-01T14:45:00+5:30
पाकिस्तानच्या कुरापती अद्यापही कायम असून मंगळवर पहाटेपासूनच सीमेपलीकडून सतत गोळीबार होत आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 1 - गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून सीमारेषेवर वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. जम्मू-काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात सात नागरिकांना मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन मुले आणि चार महिलांचा समावेश आहे. पाकिस्तानकडून सांबा आणि राजौरी सेक्टरमध्ये तुफान गोळीबार सुरू आहे.
रेशब (वर्ष 5), अभी (वर्ष 5) आणि रवींदर कौर (19 वर्ष) अशी काही मृतांची नावं समोर आली आहेत. पाकिस्तानकडून रामगडमध्ये करण्यात आलेल्या उखळी तोफांच्या हल्ल्यात रवींदर कौर या तरुणीचा मृत्यू झाला आहे. तर अरनियामधील गोळीबारात तीन भारतीय नागरिक जखमी झाले आहेत.
पाकिस्तानकडून जम्मू काश्मीर येथील रामगड येथील नागरिकांना आणि लष्करी अधिका-यांना निशाणा बनवला जात आहे, अशी माहिती एका अधिका-याने दिली आहे.
#UPDATE: One more civilian dies in ceasefire violation by Pakistan in Ramgarh sector of Samba (J&K), Death toll now rises to 7.
— ANI (@ANI_news) November 1, 2016
मंगळवारी पहाटे 5 पासून पाकिस्तानने पुन्हा गोळीबार सुरू केला असून काश्मीरमधील आर.एस. पुरा जिल्ह्यातील अरनिया सेक्टरमधील गोळीबारात 2 नागरिक जखमी झाले होते.
भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानकडून आतापर्यंत 60 पेक्षा अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. दरम्यान, भारतीय जवान पाकिस्तानच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देत आहेत.
#FLASH One 19-year old girl killed in firing by Pakistan in Ramgarh sector of Samba district, Jammu and Kashmir
— ANI (@ANI_news) November 1, 2016
Two civilians injured in ceasefire violation by Pakistan in Arnia sector of RS Pura district (J&K), injured taken to hospital pic.twitter.com/3CaLev40lQ
— ANI (@ANI_news) November 1, 2016
Encounter between security forces and terrorists underway in Ajar village in Bandipora (J&K). (Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/xr2GmHNldO
— ANI (@ANI_news) November 1, 2016