पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधी उल्लंघन, बीएसएफच्या गोळीबारात पाकिस्तानचे 3 जवान ठार
By admin | Published: October 26, 2016 07:24 AM2016-10-26T07:24:32+5:302016-10-26T07:33:54+5:30
बीएसएफनेही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत असून पाच ते सहा पाकिस्तानी रेंजर्स उद्ध्वस्त केले आहेत. तसंच केलेल्या गोळीबारात तीन पाकिस्तानी जवान ठार झाले आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
जम्मू काश्मीर, दि. 26 - पाकिस्तान अजूनही वठणीवर आला नसून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे. रात्रभर जम्मूजवळील आरएसपुरा आणि अरनिया सेक्टरमधील बीएसएफ पोस्टवर पाकिस्तानकडून फायरिंग सुरु होती. बीएसएफनेही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत असून पाच ते सहा पाकिस्तानी रेंजर्स उद्ध्वस्त केले आहेत. तसंच केलेल्या गोळीबारात तीन पाकिस्तानी जवान ठार झाले आहेत. गेल्या 20 तासांपासून गोळीबार सुरु आहे.
दरम्यान पाकिस्तानकडून सुरु असलेल्या फायरिंगमुळे दहशतीखाली असलेल्या सीमारेषेवरील ग्रामस्थ घर सोडून जाऊ लागले आहेत. फ्लोरा गावातील लोक ट्रॅक्टरच्या ट्रॉलीतून जाताना पाहिल्याचं सांगण्यात येत आहे. फायरिंगमध्ये 11 लोक जखमी झाले आहेत. राजोरी येथील नौशेरा येथे सैन्याने दिलेल्या प्रत्युत्तरात तीन पाकिस्तानी जवान ठार झाले आहेत.
#FLASH Ceasefire violations by Pakistan in RS Pura sector of J&K on for the last 20 hours,11 civilians injured, several houses damaged.
— ANI (@ANI_news) October 26, 2016