पुँछमध्ये पाकिस्तानने पुन्हा केले शस्त्रसंधीचे उल्लंघन
By admin | Published: June 1, 2015 10:28 AM2015-06-01T10:28:57+5:302015-06-01T11:46:09+5:30
जम्मू-काश्मीरमधील पुँछ जिल्ह्यात पाकिस्तानने भारतीय चौक्यांवर गोळीबार करत पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.
Next
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. १ - जम्मू-काश्मीरमधील पुँछ जिल्ह्यात पाकिस्तानने भारतीय चौक्यांवर गोळीबार करत पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.
अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैनिकांनी मध्यरात्री व पहाटेच्या सुमारास पुँछ जिल्ह्यातील कृष्णघाटी सेक्टरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील ( एलओसी) भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. सुदैवाने त्यात कोणीही जखमी झाले नाही. पाकिस्तानच्या या आगळिकीनंतर भारतीय जवानांनीही गोळीबार करत त्यांना चोख प्रत्युत्तर दिले.