पाकिस्तान भिकेचा कटोरा घेऊन फिरतोय -  पंतप्रधान नरेंद्र मोदी 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 03:06 PM2019-02-15T15:06:22+5:302019-02-15T15:48:54+5:30

Pulwama Terror Attack : पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे.

Pakistan is roaming around with its begging bowl but it’s not getting help from the world - PM Modi | पाकिस्तान भिकेचा कटोरा घेऊन फिरतोय -  पंतप्रधान नरेंद्र मोदी 

पाकिस्तान भिकेचा कटोरा घेऊन फिरतोय -  पंतप्रधान नरेंद्र मोदी 

googlenewsNext
ठळक मुद्देएकाही दहशतवाद्याला सोडलं जाणार नाही- नरेंद्र मोदीहल्लेखोरांना मोठी किंमत चुकवावी लागेल, सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य - नरेंद्र मोदी

झांसी - पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला जाणार, असा इशारा पंतप्रधान मोदींनी झांसी येथील जाहीर सभेला संबोधित करताना दिला आहे. ''भारतीय लष्कराला प्रत्युत्तराच्या कारवाईसाठी योग्य ते स्थान आणि वेळे निवडण्यासाठी संपूर्ण स्वातंत्र्य दिले गेले आहे. पुलवामाच्या हल्लेखोरांना शिक्षा नक्कीच मिळणार. आपल्या जवानांनी देशाचे संरक्षण करताना स्वतःच्या प्राणांची आहुती दिली आहे. त्यांचे हे बलिदान व्यर्थ जाणार नाही'', अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला ठणकावले आहे.

''कोणत्या वेळेस, कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या स्वरुपात प्रत्युत्तराची कारवाई करायची, याचे संपूर्ण स्वातंत्र्य सैन्य दलाला देण्यात आले आहे. शेजारील देशांच्या कुटील मनसुब्यांना आपल्या देशातील 130 कोटी जनता मिळून सडेतोड उत्तर देतील'', असाही इशाराही पंतप्रधान मोदींनी दिला आहे. 

पुढे पंतप्रधान मोदी असंही म्हणाले की, आज संपूर्ण देश दुःखी झाला आहे. तुम्हा सर्वांच्या भावना मी समजू शकतो. प्रत्युत्तराच्या कारवाईसाठी भारतीय सैन्याला संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे. पाकिस्तानची अवस्था इतकी वाईट आहे की, मोठ-मोठ्या देशांनी पाकिस्तानसोबत संबंध प्रस्थापित करताना अंतर राखले आहे. पाकिस्तान भिकेचा कटोरा घेऊन फिरत आहे. त्याची वाईट अवस्था करण्यात आली आहे.  

'नवीन रीति आणि नीतिचा भारत'
पंतप्रधान नरेंद्र मोदी असंही म्हणाले की, हा भारत नवीन रीति आणि नीतिचा आहे, हे कदाचित आपला शेजारील देश विसरत आहे. दहशतवादी संघटनांनी आणि त्यांच्या म्होरक्यांनी हिंसक मानसिकता दाखवली आहे, त्याचा संपूर्ण हिशेब चुकता केला जाईल. 


भारतीय लष्करावर सर्वांत मोठा हल्ला
दरम्यान, पुलवामा येथे (Pulwama Terror Attack) झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 38 जवान शहीद झाले आहेत. गुरुवारी (14 फेब्रुवारी)जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला झाला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. ज्या ताफ्यावर हा हल्ला झाला, त्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवली. आदिलने स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्याच्या दिशेनं नेली आणि ताफ्याजवळ जाताच स्फोट घडवला. हा हल्ला इतका भीषण होता की, स्फोटात जवानांच्या बसच्या चिंधड्या उडाल्या. 

तालिबानी स्टाईलचा हल्ला
वाहनांमध्ये स्फोटके भरून ती एखाद्या गर्दीच्या ठिकाणी घुसवायची आणि आत्मघाती हल्ला घडवून आणायचा ही तालिबानी अतिरेक्यांची स्टाइल आहे. असा हल्ला आतापर्यंत भारतात, काश्मीरमध्ये कधीही झाला नव्हता. जैश-ए-मोहम्मदचा कमांडर अब्दुल रशीद गाझी याने या हल्ल्यासाठी आयईडी स्फोटांचे ट्रेनिंग दिले होते. तो तालिबानी संघटनेत कार्यरत होता. त्यानेच हा हल्ला तालिबानी स्टाइलने घडविल्याचे म्हणणे आहे. तालिबानी संघटना पाकमध्ये सैनिकांवर अशाच प्रकारे हल्ला करतात. तीच पद्धत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने गुरुवारच्या हल्ल्यात वापरली. 192 काश्मिरी तरूण गेल्या वर्षभरात दहशतवादी संघटनांमध्ये गेले आहेत.
स्थानिक तरूणांनी दहशतवादाकडे वळणे ही लष्कराच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. चकमकीत स्थानिक दहशतवाद्यांना मारल्याची काश्मीर खोऱ्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.

काय होता गुप्तचरांचा अ‍ॅलर्ट?
या हल्ल्याच्या पूर्वी भारताच्या गुप्तचर संस्थांनी अ‍ॅलर्ट जारी केला होता. त्यात म्हटले होते की, संसदेवरील ह्ल्ल्याप्रकरणी ज्या दिवशी (९ फेब्रुवारी) अफजल गुरूला फासावर लटकवण्यात आले त्याच दिवशी हल्ला करायचा कट, अतिरेक्यांनी रचला आहे. हल्ल्यावेळी आयईडी स्फोट घडविले जाऊ शकतात. सर्व सुरक्षा संस्थांनी अ‍ॅलर्ट राहावे.







 



 

Web Title: Pakistan is roaming around with its begging bowl but it’s not getting help from the world - PM Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.