पाकिस्तानला उपरती; म्हणे, ‘शस्त्रसंधी’ नक्की पाळणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 04:33 AM2018-05-30T04:33:48+5:302018-05-30T04:33:48+5:30
महिनाभरात पाकिस्तानकडून होत असलेला गोळीबार आणि तोफगोळ्यांच्या माऱ्यामुळे १ लाखांहून अधिक लोकांना विस्थापित व्हावे लागल्यानंतर
नवी दिल्ली : महिनाभरात पाकिस्तानकडून होत असलेला गोळीबार आणि तोफगोळ्यांच्या माऱ्यामुळे १ लाखांहून अधिक लोकांना विस्थापित व्हावे लागल्यानंतर अखेर दोन्ही देशांना शस्त्रसंधी कराराची आठवण झाली आहे. पाच महिन्यांत १,०५०वेळा गोळीबार करणाºया पाकिस्तानला उपरती असून, आता ‘शस्त्रसंधी’ नक्की पाळणार, असल्याचे हॉटलाइन चर्चेत मान्य केले आहे.
दोन्ही देशांच्या लष्करी मोहिमविषयक विभागाच्या महासंचालकांची (डीजीएमओ) मंगळवारी विशेष हॉटलाइनवर चर्चा झाली. त्यात शस्त्रसंधीचे उल्लंघन न करण्याबाबत २००३ साली झालेल्या कराराचे यापुढे काटेकोर पालन करण्याचा निर्णय झाला.
गेल्या काही दिवसांत पाकिस्तानने लष्करी चौक्यांबरोबरच सीमेलगतच्या गावांवरही तोफगोळ््यांचा जोरदार मारा केला होता. त्यात अनेक सुरक्षा जवान शहीद झाले व नागरिकही मारले गेले होते. त्याला भारताने तेवढेच चोख प्रत्युत्तर दिले होते.
२०१७ मध्ये अतिरेकी बुºहान वाणी भारताकडून मारला गेल्यानंतर पाकिस्तानाकडून शस्त्रसंधीचे सर्वाधिक उल्लंघन झाले होते. त्या वर्षात पाकिस्तानकडून १९७० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले. २०१८ मध्ये पाच महिन्यात पाकिस्तानाने १०५० वेळा शस्त्रसंधी मोडली.२००१ मध्ये भारताच्या संसदेवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर उद््भवलेल्या तणावानंतर दोन्ही देशांमध्ये उच्चस्तरीय चर्चा झाली होती. २००३ साली दोन्ही देशांमध्ये सीमेवर शांततेसाठी शस्त्रसंधी करार करण्यात आला होता.
पाकने केली होती विनंती
दोन्ही देशांतील तणावही वाढला होता. त्या पार्श्वभूमीवर भारताचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल अनिल चौहान व पाकिस्तानचे डीजीएमओ मेजर जनरल साहिर शमशाद मिर्झा यांच्यात झालेल्या चर्चेत जम्मू-काश्मीरमधील प्रत्यक्ष
नियंत्रण रेषा व आंतरराष्ट्रीय सीमेवरील स्थितीचा आढावा घेण्यात आला. या चर्चेसाठी पाकिस्तानने भारताला विनंती केली होती.