कुरापती पाकिस्तानच्या गोळीबारात एक बीएसएफ अधिकारी शहीद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 03:50 PM2019-01-15T15:50:49+5:302019-01-15T16:34:27+5:30
जम्मू-काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. पाकिस्तानच्या या गोळीबारात बीएसएफचा एक अधिकारी शहीद झाला आहे.
श्रीनगर - सीमारेषेवरील पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. मंगळवारीदेखील (15 जानेवारी) जम्मू-काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. पाकिस्तानच्या या गोळीबारात बीएसएफचा एक अधिकारी शहीद झाला आहे. विनय प्रसाद असे शहीद जवानाचे नाव आहे.
बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर सहाय्यक कमांडन्ट विनय प्रसाद आणि त्यांची टीम सकाळी 10.50 वाजेच्या दरम्यान गस्त घालत होती. यावेळेस पाकिस्तानी स्नायपर्सकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात विनय प्रसाद गंभीर जखमी झाला. विनय प्रसाद यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
गेल्या वर्षीही आंतरराष्ट्रीय सीमारेषा आणि नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात हल्ले घडवून कुरापती करण्यात आल्या होत्या. डिसेंबरमध्येही (2018) केरन सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. या गोळीबारात भारतीय लष्कराचे दोन अधिकारी शहीद झाले होते.
DG #BSF and all ranks salute the supreme sacrifice of Shri Vinay Prasad, Asstt. Comdt & offer condolences to the family of the #Braveheart
— BSF (@BSF_India) January 15, 2019
Shri Vinay Prasad, Asstt. Comdt attained #martyrdom on 15th Jan 2019 at #IndoPak Border #Samba-#Jammu by #unprovoked pak firing (Sniper Fire) pic.twitter.com/HCU0gVTfVz
#UPDATE Jammu & Kashmir: Assistant Commandant Vinay Prasad succumbed to his injuries in firing from across the border in Hiranagar sector, Kathua. https://t.co/8Qri93zHBY
— ANI (@ANI) January 15, 2019
Pakistan violates ceasefire in Sunderbani Sector, Jammu and Kashmir. Indian Army is retaliating.
— ANI (@ANI) January 15, 2019