पाकिस्तानचे ना'पाक' इरादे ; शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन घुसखाेरीचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2019 12:23 PM2019-08-18T12:23:50+5:302019-08-18T12:32:53+5:30
कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तान आता शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन घुसखाेरांना काश्मीरमध्ये पाठविण्याच्या प्रयत्नात आहे.
काश्मीर : कलम 370 रद्द केल्यानंतर आता पाकिस्तानने कुरापती करण्यास सुरुवात केली आहे. जम्मू काश्मिरमधून 370 रद्द केल्याने आता नियंत्रण रेषेवर दाेन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. पाकिस्तान आता सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन घुसखाेऱ्यांना भारतात पाठविण्याच्या प्रयत्नात आहे.
जम्मू काश्मिरमधून 370 हटवून एक अभूतपूर्व निर्णय माेदी सरकारने घेतला. या निर्णयानंतर पाकिस्तानने आता भारताविराेधात कुरापत्या करण्यास सुरुवात केली आहे. शस्त्रसंधीचं उल्लंघन करुन काश्मिरमध्ये घुसखाेऱ्यांना पाठविण्याचा पाकिस्तान इरादा आहे. काश्मीरमधील गुलमर्ग सेक्टर हा घनदाट जंगलाचा भाग असल्याने या ठिकाणावरुनच घुसखाेर काश्मीरमध्ये पाठविण्याचा पाकिस्तानचा मनसुबा आहे.
नियंत्रण रेषेवर गाेळीबार करुन भारतीय सैन्याला त्यात अडकवून घुसखाेऱ्यांना भारतात पाठविण्याच्या मागे सध्या पाकिस्तान आहे. या पाकिस्तानच्या कुरापत्यांची भारतीय सैन्याला कल्पना असून भारतीय सैन्य सध्या अलर्ट आहे. शनिवारी पाकिस्तानी सैन्याच्या गाेळीबारात भारताचा एक जवान शहीद झाला. पाकिस्तानच्या गाेळीबाराला उत्तर देत भारतीय सैन्याने पाकिस्तानची एक पाेस्ट नष्ट केली आहे.