पाककडून शस्त्रसंधीच्या उल्लंघनात एक जवान शहीद, दहशतवाद्यांची कुरघोडी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 10:24 PM2019-10-11T22:24:50+5:302019-10-11T22:27:28+5:30
जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर दहशतवादी सैरभैर झालेले आहेत.
नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर दहशतवादी सैरभैर झालेले आहेत. दहशतवाद्यांना आता पूर्वीसारखा पाकिस्तानकडून शस्त्रास्त्रांचा पुरवठा होत नाही, त्यामुळे ते सुरक्षा जवानांच्या हातातील शस्त्रे घेण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी माहिती उत्तर कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग चीफ लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांनी दिली आहे. ते म्हणाले, पाकिस्तान शस्त्रास्त्र पाठवण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवत आहे. तसेच अफगाण दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याच्या वृत्ताचंही त्यांनी खंडन केलं आहे. भारतीय लष्कराची तटबंदी मजबूत असून, दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी जवान सक्षम आहेत. जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषेवरील जवानांची तटबंदी मजबूत आहे.
जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तान गरळ ओकत आलाय. भारताला धडा शिकवण्यासाठी शस्त्रसंधीचं उल्लंघन करून दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावा यासाठी पाकिस्तानकडून सातत्यानं प्रयत्न सुरू असतात. पाकिस्तानी सैनिकांनी आज सकाळी नौशेरा सेक्टरमध्ये सकाळी 5.50 वाजता ते 7.30 वाजताच्या सुमारास गोळीबार केला होता.
Surge in ceasefire violations by Pak in 2019: Indian Army sources
— ANI Digital (@ani_digital) October 11, 2019
Read @ANI story | https://t.co/u8bSfNiJvMpic.twitter.com/MEbQm8FJ43
या गोळीबारात एक जवान गंभीर जखमी झाला आहे. या जवानाला तत्काळ उपचारासाठी कमांड हॉस्पिटलमध्ये उधमपूरमध्ये दाखल करण्यात आले. सायंकाळी उपचार सुरू असताना या जवानाचे निधन झाले. सुभाष थापा (वय 25) असे या जवानाचे नाव आहे. तो पश्चिम बंगालमधील दार्जिंलिंग जिल्ह्यातील सिलिगुडी येथील रहिवासी होता, अशी माहिती लष्कराचे प्रवक्ते ले. कर्नल देवेंद्र आनंद यांनी दिली.