पाकिस्तानच्या खोटारडेपणाचे पुरावेच पुरावे; भारतीय हवाई दलाकडून दाव्यांची चिरफाड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 07:31 PM2019-02-28T19:31:13+5:302019-02-28T19:48:48+5:30

पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा हवाई दलाकडून पर्दाफाश

pakistan targeted our army installations says indian air force gives proofs of falsehood | पाकिस्तानच्या खोटारडेपणाचे पुरावेच पुरावे; भारतीय हवाई दलाकडून दाव्यांची चिरफाड

पाकिस्तानच्या खोटारडेपणाचे पुरावेच पुरावे; भारतीय हवाई दलाकडून दाव्यांची चिरफाड

googlenewsNext

नवी दिल्ली: भारतीय हवाई दलानंपाकिस्तानी सैन्याच्या सर्व दाव्यांची चिरफाड केली आहे. भारताच्या लष्करी तळांवर हल्ले केले नाहीत, एफ-16 विमानाचा वापर झालेलाच नाही, असे विविध दावे पाकिस्तानकडून करण्यात आले होते. हे सर्व दावे भारतीय हवाई दलानं खोडून काढले. 'प्रत्येक विमानाचा एक इलेक्ट्रॉनिक सिग्नल असतो. भारतीय संरक्षण दलांना मिळालेला सिग्नल एफ-16 सोबत जुळतो. पाकिस्तानचं विमान ज्या ठिकाणी कोसळलं, त्या ठिकाणी आम्हाला आमराम मिसाईलचे काही अवशेषदेखील सापडले आहेत. आमराम मिसाईल वाहून नेण्याची क्षमता केवळ एफ-16 विमानांमध्ये आहे. त्यामुळे पाकिस्ताननं एफ-16 विमानाचा वापर झाला होता, हे सिद्ध होता,' अशा शब्दांमध्ये हवाई दलाचे व्हाईस मार्शल आर. जी. के. कपूर यांनी पाकिस्तानच्या सर्व दाव्यांचं पोस्टमॉर्टम केलं. भारत-पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज तिन्ही दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात हवाई दलानं पाकिस्तानच्या कारवायांची आणि त्याला भारताच्या बाजूनं देण्यात आलेल्या प्रत्युत्तराची माहिती दिली. यावेळी कपूर यांनी विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेबद्दल आनंद व्यक्त केला.







हवाई दलाचे व्हाईस मार्शल आर. जी. के. कपूर यांनी पाकिस्तानचे सर्व दावे मुद्देसूदपणे खोडून काढले. 'पाकिस्तानच्या एफ-16 विमानांनी भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी केल्याचे पुरावे आहेत. एफ-16 विमानांची हालचाल दिसताच हवाई दलानं प्रत्युत्तर दिलं. हे विमान अनेक ठिकाणी दिसलं. मिग-27, मिराज 2000, सुखोई विमानांनी एफ-16 च्या हालचाली टिपल्या. एफ-16 नं लष्करी तळांजवळ हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडून बॉम्ब टाकण्यात आले. लष्करी तळांच्या परिसरात बॉम्ब टाकले गेले. मात्र त्यामुळे कोणतीही हानी झाली नाही. यामुळेच हवाई दलानं प्रत्युत्तरादाखल कारवाई करत एफ-16 पाडलं. मिग 27 विमानानं एफ-16 जमीनदोस्त केलं,' अशी माहिती कपूर यांनी दिली.





एफ-16 विमानाचा वापर केला नाही, असा दावा पाकिस्ताननं केला. तोदेखील कपूर यांनी खोडून काढला. 'प्रत्येक विमानाचा एक विशिष्ट इलेक्ट्रॉनिक सिग्नल असतो. पाकिस्तानी विमानाकडून मिळालेला सिग्नल हवाई दलानं टिपला. तो एफ-16 शी जुळतो. पाकिस्तानकडे असलेल्या विमानांपैकी केवळ एफ-16 विमान आमरार मिसाईल घेऊन जाऊ शकतं आणि भारतीय हवाई दलानं पाडलेल्या विमानाजवळ आमरार मिसाईलचे अवशेष सापडले आहेत. यावरुन पाकिस्ताननं एफ-16 वापरल्याचं स्पष्ट होतं,' असं कपूर यांनी सांगितलं.

Web Title: pakistan targeted our army installations says indian air force gives proofs of falsehood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.