नौगाम सेक्टरमध्ये घुसलेले दहशतवादी पाकिस्तानचेच, लष्कराच्या हाती पुरावे
By admin | Published: October 8, 2016 06:17 PM2016-10-08T18:17:55+5:302016-10-08T18:17:55+5:30
जम्मू काश्मीरमधील नौगाम सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणारे दहशतवादी पाकिस्तानचेच होते अशी माहिती लष्करातील नॉर्थन कमांडने दिली आहे
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 8 - जम्मू काश्मीरमधील नौगाम सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणारे दहशतवादी पाकिस्तानचेच होते अशी माहिती लष्करातील नॉर्थन कमांडने दिली आहे. नौगाम सेक्टरमध्ये नियंत्रण रेषा पार करुन चार दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला होता. मात्र लष्कराने दहशतवाद्यांचा खात्मा करत त्यांचा कट उधळला. लष्कराने दहशतवाद्यांकडील शस्त्रसाठा आणि इतर साहित्य जप्त केलं आहे. यामधील हॅण्ड ग्रेनेडवर पाकिस्तानमधील फॅक्टरीचा शिक्का असल्याची माहिती लष्कराच्या प्रवक्त्याने दिली आहे.
लष्कराने जप्त केलेल्या गोष्टींमध्ये स्फोटक साहित्य सापडलं असून यामध्ये प्लास्टिकच्या सहा बॉटल्स, पेट्रिलिअम जेलीच्या सहा बॉटल्स, ज्वालाग्राही द्रव्य आणि लाईटर्स आहेत.
11 सप्टेंबरला पूंछ हल्ल्यात आणि 18 सप्टेंबरच्या उरी हल्ल्यातही याच ज्वालाग्राही द्रव्याचा वापर करण्यात आला होता. यामुळे या हल्ल्यातही पाकिस्तानचाच हात असल्याचं स्पष्ट झाल्याचं दिसत आहे अशी माहिती लष्कराने दिली आहे.
पाच आणि सहा डिसेंबरला दिवसभरात लष्कराने एकूण घुसखोरीचे तीन प्रयत्न उधळले होते. नौगाम सेक्टरमध्ये दोन तर रामपूर सेक्टरमध्ये एक प्रयत्न झाला होता. नौगाम सेक्टरमध्ये सुरक्षा जवानांनी दहशतवाद्यांचा प्रयत्न उधळून लावला आणि चार दहशतवाद्याला ठार केलं.
Recoveries of Naugam Operation (October 6th) confirm Pakistan connection, says Northern Command, Indian Army. pic.twitter.com/mp19Og7ijs
— ANI (@ANI_news) October 8, 2016