पाकची कुरापत, फुग्यामध्ये पत्र देऊन भारताला धमकी
By admin | Published: October 2, 2016 09:15 AM2016-10-02T09:15:10+5:302016-10-02T14:14:33+5:30
पाकिस्तानच्या कुरापती अजूनही सुरूच आहेत. काल सांयकाळी फुग्यामध्ये पत्र देऊन भारताला धमकीदेण्यात आली आहे.
ऑनलाइन लोकमत
पठाणकोट, दि. २ : पाकिस्तानच्या कुरापती अजूनही सुरूच आहेत. काल सांयकाळी फुग्यामध्ये पत्र देऊन भारताला धमकीदेण्यात आली आहे. पंजाबमधील दीनानगर जवळील घेस्ल गावाजवळ पाकिस्तानचा फुगा आढळला आहे. या फुग्यामध्ये एक पत्र होत त्या पत्रात पाकिस्तानी अवाम असा उल्लेख केला होता. शिवाय त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी देण्यात आली आहे.
गावातील ऐका स्थानिक ग्रामस्थास आपल्या घराजवळ फुगा आढळला, त्यावर उर्दूमध्ये लिहलेलं असल्यामुळे त्याने तो फुगा पोलीसाकडे सपुर्तू केला. पोलीसांना मिळालेला त्या पिवळ्या रंगाच्या फुग्यावर एक कागद लावलेला आहे. मोदीजी, अयुबी की तलवारे अभी हमारे पास हैं. इस्लाम जिंदाबाद, असा मजकूर त्या कागदावर लिहलेला होता.
योगायोगाने, पाकिस्तानकडून हल्ल्याची भीती लक्षात घेऊन पंजाबच्या सीमाभागातून स्थलांतरित करण्यात आलेल्या लोकांसाठीच्या व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल हे शनिवारी गुरुदासपूर व पठाणकोट या सीमेवरील जिल्ह्य़ांचा दौरा करणार होते. गेल्या जुलै महिन्यात दिनानगरच्या झंडे चाक खेडय़ानजीक पोलिसांनी एक फुगा जप्त केला होता. त्यावर आय लव्ह पाकिस्तान अशी अक्षरे असलेल्या पाकिस्तानी झेंडय़ाचे चित्र होते.
दरम्यान, भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानच्या कुरापती आणखी वाढल्या आहेत. सीमेवर पाकिस्तानी सैन्याच्या हालचाली देखील वाढल्या असून काही भागांमध्ये पाकिस्तानी रेंजर्स दिसल्याचे कळत आहे. गेल्या 56 तासांमध्ये पाचपेक्षा अधिक वेळा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे