पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन

By admin | Published: August 2, 2015 10:45 PM2015-08-02T22:45:00+5:302015-08-02T22:45:00+5:30

पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमेवर पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानी रेंजर्सनी शनिवारी रात्रीपासून जम्मू जिल्ह्याच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरील

Pakistan violates ceasefire | पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन

पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन

Next

जम्मू : पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमेवर पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानी रेंजर्सनी शनिवारी रात्रीपासून जम्मू जिल्ह्याच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरील भारतीय सीमा चौक्यांवर अंदाधुंद गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा केला.
पाकिस्तानी रेंजर्सनी शनिवारी रात्री १०.३० वाजता आरएसपुरा भागातील भारतीय सीमा चौक्यांवर दोन तोफगोळे डागले, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्याने दिली. सीमेवर तैनात असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पाकच्या या गोळीबाराला गोळीबारानेच प्रत्युत्तर दिले. यात कोणतीही जीवहानी झाली नाही. आंतरराष्ट्रीय सीमेवर गेल्या १२ तासांत पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याची ही दुसरी वेळ आहे. शुक्रवारी पाकिस्तानी रेंजर्सनी अखनूर सेक्टरमधील भारतीय सीमा चौक्यांवर गोळीबार आणि तोफगोळे डागले होते.
भारतीय मच्छीमारांची सुटका
कराची : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यात रशियातील उफा येथे झालेल्या बैठकीनंतर, पाकिस्तानने रविवारी १६३ भारतीय मच्छीमारांची सुटका गुडविल व्यवहाराअंतर्गत के ली आहे.
रविवारी सुटका झालेल्या १६२ मच्छीमारांत एक ११ वर्षांचा मुलगाही आहे. त्यांना वाघा सीमेपर्यंत आणून भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Web Title: Pakistan violates ceasefire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.