पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, 2 जवान शहीद

By admin | Published: May 1, 2017 12:35 PM2017-05-01T12:35:01+5:302017-05-01T16:05:14+5:30

जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडूून गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात दोन जवान शहीद झाले आहेत.

Pakistan violates ceasefire, 2 jawans martyrs | पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, 2 जवान शहीद

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, 2 जवान शहीद

Next

 ऑनलाइन लोकमत

श्रीनगर, दि. 1 - पाकिस्ताननं शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय सैन्यांच्या चौकीवर भ्याड हल्ला चढवला. या गोळीबारात दोन जवान शहीद झाले आहेत. तर तीन जवान जखमी झाले आहेत. 

जम्मू काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील कृष्ण घाटीमधील ही घटना आहे. 
 

दरम्यान, 27 एप्रिल रोजी काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात पंझगाम येथील लष्करी तळावर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एका कॅप्टनसह तीन जवान शहीद, तर पाच जण जखमी झाले. लष्कराने केलेल्या प्रतिहल्ल्यात दोन अतिरेकी ठार झाले होते.

यावेळी स्थानिकांनी जमाव जमवून दगडफेक सुरू केल्याने सुरक्षा दलांच्या कारवाईत अडथळे येत होते. त्यामुळे सुरक्षा दलांना जमावावर कारवाई करावी लागली होती. यात जखमी झालेल्या एका नागरिकाचा सायंकाळी मृत्यू झाला होता. यामुळे तणावाची परिस्थिती  निर्माण झाली होती.
 
दहशतवाद्यांनी पंझगाम येथील लष्करी छावणीवर पहाटे 4 वाजता हल्ला केला. ही छावणी येथून 100 कि.मी. अंतरावर आहे. या हल्ल्यात एका अधिकाऱ्यासह तीन लष्करी जवान शहीद झाले. चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्तान घातले, असे लष्करी प्रवक्त्याने सांगितले. कॅप्टन आयुष, असे शहीद अधिकाऱ्याचे नाव आहे. उर्वरित दोन जवानांची नावे समजू शकली नाहीत. या हल्ल्यात इतर पाच जवान जखमी झाले आहेत.
 
अंद्राबी यांना अटक
जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी फुटीरवादी नेत्या आसिया अंद्राबी यांना गुरुवारी अटक केली. त्यांनीच खोऱ्यातील महिलांना सुरक्षा दलांवर दगडफेक करण्यास कथितरीत्या चिथावणी दिल्याचा आरोप आहे.

 

Web Title: Pakistan violates ceasefire, 2 jawans martyrs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.