पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारतीय जवानांचं गोळीबाराला चोख प्रत्युत्तर
By admin | Published: June 3, 2017 07:34 AM2017-06-03T07:34:58+5:302017-06-03T08:10:28+5:30
सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती थांबण्याचं नावच घेत नाहीत. पाकिस्ताननं जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ परिसरात शस्त्रसंधीचं उल्लंघन केले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 3 - सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती थांबण्याचं नावच घेत नाहीत. पाकिस्ताननं जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ परिसरात शस्त्रसंधीचं उल्लंघन केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास पाकिस्ताननं तोफगोळ्यांचा मारा तसंच गोळीबार केला. दरम्यान आताही गोळीबार सुरू असल्याचे वृत्त आहे. भारतीय जवानांकडूनही पाकिस्तानच्या गोळीबाराला जशास तसं चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. दरम्यान, या गोळीबारात एक नागरिक जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
दरम्यान, भारतीय लष्कराने पाकिस्तानी चौक्यांवर प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात गुरुवारी (31 मे) पाकिस्तानचे पाच सैनिक ठार, तर सहा जखमी झाले होते. तत्पूर्वी पहाटे पाकने शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत राजौरी आणि पुंछ जिल्ह्यात गोळीबार केला होता. भारतीय सुरक्षा दलांनी हिजबुल मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवाद्यांनाही गुरुवारी ठार मारले. ते दोघे स्थानिक होते.
रावत यांनी घेतला आढावा
काश्मीर आणि नियंत्रण रेषेवर तैनात सुरक्षा दलांची सज्जता आणि एकूण सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी लष्करप्रमुख बिपीन रावत गुरुवारी येथे दाखल झाले होते. खोऱ्यातील सुरक्षा स्थिती आणि लष्करी सज्जतेचा आढावा घेणे हा रावत यांच्या दौऱ्याचा उद्देश होता.
हिजबुलचा कमांडर सबझार भट मारला गेल्यानंतर काश्मिरात तणाव कायम आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून खोऱ्यातील शाळा आणि महाविद्यालये गुरुवारी सलग चौथ्या दिवशी बंद ठेवण्यात आली.
Ceasefire violation by Pakistan in J&K"s Poonch; Small arms, automatics ,82 mm and 120 mm mortars fired by them from 11 pm yesterday
— ANI (@ANI_news) June 3, 2017
Indian Army posts are retaliating to the firing by Pakistan; firing is presently on in J&K"s Poonch.
— ANI (@ANI_news) June 3, 2017
#UPDATE One civilian injured in ceasefire violation by Pakistan in Jammu and Kashmir"s Poonch, firing underway.
— ANI (@ANI_news) June 3, 2017