नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, एक जवान शहीद, एका मुलीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 05:49 PM2019-04-01T17:49:49+5:302019-04-01T17:51:29+5:30
नियंत्रन रेषेवर सातत्याने कुरापती काढणाऱ्या पाकिस्ताने आज पुन्हा एकदा शस्रसंधीचे उल्लंघन केले असून, पुंछ जिल्ह्यातील मनकोट आणि कृष्णा घाटी परिसरात पाकिस्तानी सैन्याने मोठ्या प्रमाणावर गोळीबार केला.
श्रीनगर - नियंत्रन रेषेवर सातत्याने कुरापती काढणाऱ्या पाकिस्ताने आज पुन्हा एकदा शस्रसंधीचे उल्लंघन केले असून, पुंछ जिल्ह्यातील मनकोट आणि कृष्णा घाटी परिसरात पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाला आहे, तर चार जवान जखमी झाले आहेत. तसेच या गोळीबारात एका पाच वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे.
आज सकाऴापासूनच पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेला लागून असलेल्या मनकोट आणि कृष्णा घाटी परिसरात पाकिस्तानने शस्रसंधीचे उल्लंघन करून गोळीबार सुरू केला. या गोळीबारात भारताचे पाच जवान जखमी झाले. त्यापैकी एका जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, या गोळीबारात एका पाच वर्षीय मुलीचाही मृत्यू झाल्याची माहिती पुंछ जिल्ह्याचे डीडीसी राहुल यादव यांनी दिली.
Visuals from Poonch District Hospital: Total 5 security personnel got injured, of which 1 succumbed to his injuries, in ceasefire violation in Mankote & Krishna Ghati sectors of Poonch district, today. A 5-year-old girl has also died in the ceasefire violation. #JammuAndKashmirpic.twitter.com/hMC4RnmqGt
— ANI (@ANI) April 1, 2019
#UPDATE Rahul Yadav, District Development Commissioner (DDC) Poonch: In ceasefire violation by Pakistan, a 5-year-old girl has died. #JammuAndKashmirhttps://t.co/93TF1KyZlJ
— ANI (@ANI) April 1, 2019