पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन
By admin | Published: October 3, 2016 11:28 AM2016-10-03T11:28:56+5:302016-10-03T11:28:56+5:30
पूंछमधील शहापूर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. पाकिस्तानी सैन्यांनी गेल्या आठवड्यात चौथ्यांदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे
Next
ऑनलाइन लोकमत
जम्मू काश्मीर, दि. 3 - भारताने सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर तरी पाकिस्तान धडा शिकेल आणि आपल्या कारवाया थांबवेल असं वाटत असतानाच पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. पूंछमधील शहापूर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. पाकिस्तानी सैन्यांनी गेल्या आठवड्यात चौथ्यांदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे.
दरम्यान रात्री दहशतवाद्यांनी भारतीय लष्करावर बारामुल्लामध्ये घुसखोरी करून हल्लादेखील केला होता. दहशतवाद्यांनी राष्ट्रीय रायफलच्या 46 या कॅम्पमधून थेट सार्वजनिक पार्कमध्ये प्रवेश केला होता. भारतीय जवानांनीही या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. मात्र दहशतवादी हल्ल्यात तीन जवानही जखमी झाले असून, एक जवान शहीद झाला आहे. दहशतवादी आणि जवानांमध्ये झालेली जोरदार चकमक अखेर थांबली आहे.
बारामुल्ला शहरापासून हा कॅम्प 54 किलोमीटर लांब आहे. येथे राष्ट्रीय रायफलच्या 46 बटालियनचे मुख्यालय आहे. याच मुख्यालयाला अतिरेक्यांनी रात्री 10.30 वाजता लक्ष्य केले. दोन अतिरेकी या ठिकाणी आत्मघाती हल्ल्याच्या मनसुब्याने आले होते. मात्र, भारतीय जवानांनी अतिरेक्यांच्या दिशेने तुफान गोळीबार केला. शिवाय धडक कृती दलाला आणि पोलिसांचे विशेष पथकही पाचारण करण्यात आले.