पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; सीमावर्ती भागातील शाळा बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 08:08 PM2018-12-24T20:08:05+5:302018-12-24T20:11:21+5:30
गोळीबारामुळे खबरदारीचा उपाय म्हणून येथील जिल्हा प्रशासनाने या भागातील शाळा बंद करण्याचा आदेश दिला आहे.
जम्मू : नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानच्या सैनिकांकडून गोळीबार करण्यात आला.
या गोळीबारामुळे खबरदारीचा उपाय म्हणून येथील जिल्हा प्रशासनाने या भागातील शाळा बंद करण्याचा आदेश दिला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून सकाळी नऊ वाजता नौशेरा सेक्टरमधील केरी, लाम, पुखर्नी आणि पीर बडासेर भागात गोळीबार करण्यात आला. या भागात जवळपास पाच तास गोळीबार झाला.
Yougal Manhas, SSP Rajouri: Schools closed along the LoC after ceasefire violations by Pakistan in Keri & Nowshera sector early this morning.#JammuAndKashmirpic.twitter.com/83N64DaVod
— ANI (@ANI) December 24, 2018
राजौरीमधील वरिष्ठ पोलीस अधीक्षक युगल मन्हास यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने प्रशासनाने नियंत्रण रेषेपासून जवळपास पाच किलोमीटरच्या परिसरात असणाऱ्या सर्व शाळा बंद करण्याचा आदेश दिला आहे. तसेच, पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबाराला भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आला आहे. तसेच, या गोळीबारामुळे कोणतीही जीवितहानी झाली असल्याचे अद्याप वृत्त नाही. दरम्यान, या गोळीबारामुळे नियंत्रण रेषेजवळील भागात राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
Jammu and Kashmir: Pakistan violates ceasefire in Nowshera sector of Rajouri district pic.twitter.com/DM08HVnNh2
— ANI (@ANI) December 24, 2018