काश्मिरात हिंसेला पाकच जबाबदार!

By admin | Published: July 19, 2016 04:53 AM2016-07-19T04:53:45+5:302016-07-19T04:53:45+5:30

काश्मीरमधील हिंसाचाराला पाकिस्तानच पूर्णपणे कारणीभूत असून, पाकच्या या नापाक कारवाया मोडून काढल्या जातील,

Pakistan violence responsible for violence! | काश्मिरात हिंसेला पाकच जबाबदार!

काश्मिरात हिंसेला पाकच जबाबदार!

Next


नवी दिल्ली : काश्मीरमधील हिंसाचाराला पाकिस्तानच पूर्णपणे कारणीभूत असून, पाकच्या या नापाक कारवाया मोडून काढल्या जातील, अशी ग्वाही देतानाच, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सोमवारी राज्यसभेत काश्मिरातील
संतप्त जमावांना पांगवण्यासाठी शस्त्रांचा वापर करताना अधिकाधिक संयम बाळगण्याच्या आणि मनुष्यहानी टाळण्याच्या सूचना सुरक्षा दलाला देण्यात आल्या आहेत. मात्र काश्मीर प्रश्नाचे कोणीही राजकारण करू नये, या प्रश्नाबाबत सर्व राजकीय पक्षांशी केंद्र सरकार तयार आहे, असे स्पष्ट केले.
काश्मिरातील स्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक बिघडत असल्याबद्दल झालेल्या चर्चेमध्ये सर्वच पक्षांच्या सदस्यांनी चिंता व्यक्त करताना पाकिस्तानच्या कारवाया हाणून पाडल्या पाहिजेत, असे मत व्यक्त केले. मात्र तेथील स्थिती हाताळण्यात केंद्र सरकारला पूर्णपणे अपयश आल्याची टीका सर्वच विरोधी सदस्यांनी केली. काश्मीर प्रश्न गोळीबाराने आणि सशस्त्र सैनिकांच्या मदतीने सुटणार नाही. त्यासाठी देशातील आणि काश्मीरमधील सर्व पक्ष आणि गट यांच्याशी केंद्राने चर्चा सुरू करावी. चर्चेतूनच हा प्रश्न सुटू शकेल, असेही प्रतिपादन अनेक सदस्यांनी केले. सरकारने काश्मिरी जनतेला अतिरेकी वा दहशतवादी समजू नये आणि जनतेला तसे वागवू नये, असे मत अनेक सदस्यानी व्यक्त केले. राष्ट्रवादीचे प्रफुल फटेल म्हणाले की, काश्मीरमध्ये सध्या जे सुरू आहे, ते अतिशय भयावह आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>‘चाय पे चर्चा’त मतलब नाही
काश्मीर जळत
असताना आपण पाकिस्तानशी चाय पे चर्चा करण्यात मतलब नाही. काश्मीरचा प्रश्न हा एका राज्याचा प्रश्न नाही. तो भारताच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, हे समजून सरकारने वागणे गरजेचे आहे.
- संजय राऊत, शिवसेना

Web Title: Pakistan violence responsible for violence!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.