Corona Vaccine For Pakistan: दानत लागते! वैरी असूनही पाकिस्तानला भारत कोविशिल्डचे 1.6 कोटी डोस देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 07:52 AM2021-03-10T07:52:51+5:302021-03-10T08:01:39+5:30

Corona Vaccine For Pakistan: get 1.6 crore doses of Covishield by India - पुण्याची कंपनी सीरम इंस्टीट्यूटमध्ये बनविण्यात येत असलेली ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेकाची लस पाकिस्तानसाठी उपलब्ध केली जाणार आहे. द ग्‍लोबल अलायंस फॉर वैक्‍सीन अँड इम्यूनाइजेशन (Gavi) द्वारे ही लस पाकिस्तानला उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Pakistan will get 1.6 crore doses of Covishield by India | Corona Vaccine For Pakistan: दानत लागते! वैरी असूनही पाकिस्तानला भारत कोविशिल्डचे 1.6 कोटी डोस देणार

Corona Vaccine For Pakistan: दानत लागते! वैरी असूनही पाकिस्तानला भारत कोविशिल्डचे 1.6 कोटी डोस देणार

Next

पाकिस्तान ((Pakistan) भारताविरोधात गेल्या काही दशकांपासून दहशतवाद पोसत आला आहे. या दहशतवाद्यांवर एवढा पैसा उधळला की आता त्यांच्याकडे खायलाही पैसे नाहीत. दररोज सीमेपलिकडून उखळी तोफा, गोळीबार ठरलेलाच. या दहशतवादामुळे अनेक भारतीय जवानही शहीद झाले आहेत. तरीही भारताने नेहमी पाकिस्तानला मदत केली आहे. आजही कोरोनाच्या संकटात भारताने स्वत:ची गरज विसरून कंगाल झालेल्या पाकिस्तानला कोरोना लसीचे (Corona Vaccine) तब्बल 1.6 कोटी डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. (Pakistan will use Made in India Corona Vaccine for vaccination drive.)


 पुण्याची कंपनी सीरम इंस्टीट्यूटमध्ये बनविण्यात येत असलेली ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेकाची लस पाकिस्तानसाठी उपलब्ध केली जाणार आहे. द ग्‍लोबल अलायंस फॉर वैक्‍सीन अँड इम्यूनाइजेशन (Gavi) द्वारे ही लस पाकिस्तानला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही संघटना जगातील गरीब देशांना कोरोना लस देण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे. यानुसार पाकिस्तानला कोरोना लसीचे पहिले पार्सल मार्चच्या मध्यावर पोहोच केले जाणार आहे. तर जूनपर्यंत 1.6 कोटी डोस पोहोचते केले जाणार आहेत. 

गेल्या आठवड्यात पाकिस्ताननेच खुलासा केला...
जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरूवात झाली आहे. भारतातही या लसीकरणाला सुरूवात झाली असून भारतानं अनेक देशांना आतापर्यंत लसीचा पुरवठा केला आहे. परंतु पाकिस्ताननं भारताकडे लसींची मागणी केली नव्हती. चीननं काही लसी पाकिस्तानला मोफत दिल्या होत्या. परंतु आता मोठी बाब समोर आली आहे. पाकिस्तान आताही मोफत लस मिळण्याच्याच भरवशावर असून यावर्षी पाकिस्तान आपल्या देशातील नागरिकांसाठी लसींची खरेदी करणार नसल्याचं वृत्त एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीनं दिलं आहे.

Corona Vaccine: ...तर कोरोना लसीचा प्रचंड तुटवडा भासणार; सीरम इन्स्टीट्यूटचा केंद्राला इशारा


नॅशनल हेल्थ सर्व्हिसेसचे सेक्रेटरी अमिर अशरफ ख्वाजा यांनी गुरूवारी पब्लिक अकाऊंट कमिटीच्या ब्रिफिंगदरम्यान ही माहिती दिली. "इमरान सरकार सध्या महासाथीचा सामना करण्यासाी हर्ड इम्युनिटी आणि आपल्या सहकारी देशांकडून मोफत मिळणाऱ्या लसीच्या पुरवठ्यावर अवलंबून असेल," असं ख्वाजा यांनी सांगितलं. कोरोना विषाणूच्या महासाथीपासून आपल्या देशातील नागरिकांचा बचाव करण्यासाठी अनेक देश मोठ्या प्रमाणात लसींची खरेदी करत आहेत. परंतु या उलट पाकिस्तान लसींची खरेदी करण्याऐवजी आंतरराष्ट्रीय डोनर्स आणि चीनसारख्या देशांवर लसीसाठी मोफत लसीसाठी अवलंबून आहे.

Web Title: Pakistan will get 1.6 crore doses of Covishield by India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.