हाफिज सईदला पाठिंबा देणा-या पाक लष्करप्रमुखांनी भारतासोबत संबंध सुधारण्याचे खासदारांना केले आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2017 10:07 AM2017-12-21T10:07:40+5:302017-12-21T11:54:00+5:30

पाकिस्तानातील लोकनियुक्त सरकारने भारतासोबत संबंध सुधारण्याचे कितीही प्रयत्न केले तरी त्याला पाकिस्तानी लष्कराची संमती असणे आवश्यक असते.

Pakistani Army Chief Supporting Hafiz Saeed | हाफिज सईदला पाठिंबा देणा-या पाक लष्करप्रमुखांनी भारतासोबत संबंध सुधारण्याचे खासदारांना केले आवाहन

हाफिज सईदला पाठिंबा देणा-या पाक लष्करप्रमुखांनी भारतासोबत संबंध सुधारण्याचे खासदारांना केले आवाहन

Next
ठळक मुद्देपाकिस्तानने भारतासोबतच्या संबंधांमध्ये सुधारणा करावी यासाठी अमेरिकेकडून जोर दिला जात आहे. भारताबरोबर संबंध सुरळीत व्हावेत यासाठी राजकीय नेतृत्वाने पुढाकार घेतल्यास पाठिंबा द्यायला लष्कर तयार आहे.

लाहोर - भारत-पाकिस्तान संबंधात पाकिस्तानी लष्कराची भूमिका नेहमीच महत्वाची राहिली आहे. कारण पाकिस्तानातील लोकनियुक्त सरकारने भारतासोबत संबंध सुधारण्याचे कितीही प्रयत्न केले तरी त्याला पाकिस्तानी लष्कराची संमती असणे आवश्यक असते. कारण पाकिस्तानात परराष्ट्र संबंधाच्या विषयामध्ये लष्कराचा शब्द अंतिम समजला जातो. आता पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी पाकिस्तानी खासदारांना भारतासोबत संबंध सुधारण्याची विनंती केली आहे. संबंध सुधारण्याच्या या प्रक्रियेला लष्कराचा पूर्ण पाठिंबा असेल असे आश्वासनही त्यांनी खासदारांना दिले आहे. 

पाकिस्तानने भारतासोबतच्या संबंधांमध्ये सुधारणा करावी यासाठी अमेरिकेकडून जोर दिला जात आहे. लष्करप्रमुख कमर बाजवा यांनी त्याच पार्श्वभूमीवर हे आवाहन केले आहे. भारताबरोबर संबंध सुरळीत व्हावेत यासाठी राजकीय नेतृत्वाने पुढाकार घेतल्यास पाठिंबा द्यायला लष्कर तयार आहे. सिनेट कमिटीमध्ये खासदारांसमोर बोलताना त्यांनी हे आवाहन केले. सिनेटचे चेअरमन राझा रब्बानी यांनी कमर बाजवा यांना निमंत्रण दिले होते. आयएसआयचे प्रमुख नावीद मुख्तारही यावेळी त्यांच्यासोबत होते. 

भारत-पाकिस्तानमधील चांगल्या संबंधांना पाकिस्तानी लष्कराचा विरोध असतो अशी एक धारणा आहे. त्यापार्श्वभूमीवर पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी व्यक्त केलेले मत महत्वपूर्ण आहे. याच कार्यक्रमात बाजवा यांनी भारतावर आरोपही केले. भारतीय लष्करातील मोठया घटकाचा पाकिस्तानला विरोध असून पाकिस्तानात अस्थिरता निर्माण करण्यामध्येही भारताचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला. 

पाकिस्तान लष्करप्रमुखांनी दिला हाफिज सईदला पाठिंबा 

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असलेल्या हाफिझ सईद याला संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी घोषित केले आहे. मात्र पाकिस्तानमध्ये राजकारणी आणि लष्कराकडून त्याला मिळत असलेल्या पाठिंब्यात घट झालेली नाही. काही दिवसांपूर्वी माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांनी हाफिझ सईदची बाजू घेतल्यानंतर आता पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी हाफिस सईदची तळी उचलताना त्याने प्रत्येक पाकिस्तानी नागरिकाप्रमाणेच काश्मीर समस्या सोडवण्यासाठी सक्रिया भूमिका घेतली आहे, असे बाजवा यांनी म्हटले आहे. 

Web Title: Pakistani Army Chief Supporting Hafiz Saeed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.