Video: पाकिस्तानी नागरिकांची भारतविरोधी घोषणाबाजी, प्रशांतने दाखवून दिला 'मराठी बाणा'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 12:02 PM2020-08-17T12:02:42+5:302020-08-17T12:07:48+5:30
गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून ते जगभरात पसरललेल्या भारतीयांना 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा केला. कोरोनाच्या सावटात सोशल डिस्टन्सिंग आणि इतर नियमांचे पालन करुन यंदाचा ध्वजारोहण सोहळा पार पडला.
नवी दिल्ली - देशात 15 ऑगस्ट 2020 रोजी 74 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. जगावर कोरोनाचं सावट असल्याने यंदाचा स्वातंत्र्य दिन अतिशय साध्या पद्धतीने साजरा झाला. मात्र, नागरिकांमध्ये देशभक्ती आणि देशप्रेमचा जोश तेवढाच असल्याचं दिसून आलं. सोशल मीडियावरुन आपल्या देशभक्तीच्या भावना देशवासियांनी शेअर केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही लाल किल्ल्यावरुन तिरंगा ध्वजाला सलामी देत देशाला संबोधित केले. विदेशात असलेल्या भारतीयांनीही परदेशात तिरंगा फडकवला.
गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून ते जगभरात पसरललेल्या भारतीयांना 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा केला. कोरोनाच्या सावटात सोशल डिस्टन्सिंग आणि इतर नियमांचे पालन करुन यंदाचा ध्वजारोहण सोहळा पार पडला. भारताच्या स्वातंत्र्य दिनीच पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिना साजरा करण्यात येतो. जर्मनीतील फ्रँकफर्ट येथे पाकिस्तानी नागरिकांकडून भारतविरोधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध घोषणाबाजी करण्यात येत होती. यावेळी, पाकिस्तान झिंदाबादचा जयघोष करतही, पाकिस्तानी झेंडा फडकावत पाकिस्तानी नागरिक एकजूट झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, भारतविरोधी घोषणा देणाऱ्या या पाकिस्तानी नागरिकांना भारताच्या एकट्या आव्हान दिलं. विरेंदर सेहवागचा डायलॉग म्हणत, बाप बाप होत है... असे ठणकावून सांगत प्रशांत वेंगुर्लेकर याने तिरंगा फडकवला. प्रशांत हा सिव्हील इंजिनिअर असून तो सध्या जर्मनीत काम करतोय.
Proud of you Prashant - Jai Hind 🇮🇳 https://t.co/9EpRPWKgzL
— Riteish Deshmukh (@Riteishd) August 17, 2020
प्रशांतच्या दाखवलेल्या हिंमतीमुळे पाकिस्तानी नागरिक त्याच्या अंगावर धावून आले, तरीही त्याने तिरंगा फडकावत आपण घाबरत नसल्याचं दाखवून दिलं. अभिनेता रितेश देशमुखने प्रशांतचा हा व्हिडिओ ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. तसेच, प्राऊड ऑफ यू प्रशांत, जय हिंद. असे कॅप्शनही रितेशने दिलंय. प्रशांतने देशप्रेमाचा मराठी बाणा दाखवून द्वेषभावना पसरवणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना चांगलाच धडा शिकवला.