पाकिस्तानी नागरिकानं दिलं 10 भारतीयांना जीवदान
By admin | Published: March 27, 2017 01:47 PM2017-03-27T13:47:07+5:302017-03-27T13:47:07+5:30
पाकिस्तानी तरुणाची हत्या करण्याच्या आरोपाखाली यूएईत 10 भारतीयांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती पण त्यांना आता दिलासा मिळाला आहे.
ऑनलाइन लोकमत
अबूधाबी, दि. २७ - पाकिस्तानी तरुणाची हत्या करण्याच्या आरोपाखाली यूएईत 10 भारतीयांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती पण त्यांना आता दिलासा मिळाला आहे. बीबीसी उर्दूच्या वृत्तानुसार, हत्या झालेल्या पाक तरुणाच्या वडिलांनी पंजाबच्या त्या 10 जणांना माफ केलं आहे. 2015 मध्ये अबूधाबीमध्ये एका पाक तरुणाची हत्या केल्याप्रकरणी दहा भारतीयांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.
2015 मध्ये पाकिस्तानी तरुण मोहमद्द फरहान याची हत्या झाली होती. त्याप्रकऱणी 10 भारतीयांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मोहमद्द फरहानच्या वडिलांनी इस्लामिक कायदा शरीयतनुसार युएई कोर्टात याचिका दाखल केली. यामध्ये त्यांनी दोन्ही पक्षाचा सहमतीने प्रकरण मिटवण्याची मागणी केली. त्यामध्ये त्यांनी ब्लडमनीची मागणी केली आहे. शरीयत कायद्यानुसार एखाद्याला माफ करायचे असल्यास त्याबदल्याल पैशांची मागणी केली जाती त्यास ब्लड मनी म्हणतात. कोर्टाने त्यांच्या या याचिकेवर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
मोहमद्द फरहानच्या वडिलांनी या याचिकेत असंही म्हटलं आहे की., आता माझ्या मुलगा परत येणार नाही. या दहा जणांना फाशी झाल्यास त्यांच्या आई-वडिल आणि बायको-मुलांचं काय होईल. घरातील एकदा तरुण बाहेर देशात कामाला जातो तेव्हा त्याच्यावर घरातील कुटुंबिंयांचा खर्च अवलंबून असतो.
गल्फन्यूज डॉट कॉमच्या वृत्तानुसार, मोहमद्द फरहानच्या घरच्यांना मदत म्हणून 200,000 यूएई डिरहॅम दिले जातील. हे पैसे दुबईतील भारतीय उद्योगपती एस.पी. सिंग ऑबेरॉय देणार आहेत. ऑबेरॉय एक एनजीओ चालवतात. एनजीओ मार्फत य़ुएईतील भारतीयांची मदत करतात. ज्या दाहा भारतीयांना शिक्षा माफ झाली आहे. ते सर्व भारतीय पंजाब आणि हरियानातील आहेत.